दोडामार्ग बाजारपेठेत छ. शिवाजी महाराज यांची होणार स्थापना
▪️ शनिवारी अनावरण, शिवप्रेमीचे दातृत्व, नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांची माहिती
दोडामार्ग - वार्ताहर
दोडामार्ग शहरातील बाजारपेठेमधील मुख्य पिंपळेश्वर चौकातील सुशोभीकरण केलेल्या ठिकाणी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवप्रेमींकडून पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याचे उद्या शनिवारी सायं ३ वाजता विधिवत पूजा करण्यात येणार असून याचवेळी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण ही करण्यात येणार आहे. तरी सोहळ्यास तालुक्यातील तसेच अन्य भागातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिली आहे.
महाराष्ट्र - गोवा - कर्नाटक राज्याना जोडणारा महत्वाचा तालुका म्हणजे दोडामार्ग. येथील चौक सुशोभीकरणाचे काम येथील नगरपंचायतने हाती घेतल्यावर या ठिकाणी महाराष्ट्रचे आराद्यदैवत छ. शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे सुतोवाच नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केले होते. मात्र त्या ठिकाणी शिवप्रेमींनी महाराजांच्या पुतळा उभारला आहे. त्यामुळे दोडामार्ग नगरीचा नगराध्यक्ष या नात्याने शिवप्रेमींच्या या निर्णयाचे आपण स्वागत करतो असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
नगराध्यक्ष या नात्याने विधिवत पूजा करणे माझे प्रथम कर्तव्य
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवप्रेमींकडून पिंपळेश्वर चौकात बसविल्याचे आपणास माहिती मिळाली. त्यानंतर आपण व आपल्या सहकाऱ्यांना विचारात घेऊन महाराजांच्या पुतळ्याचे विधिवत पूजा करण्याचे ठरविले. त्यामुळे आज शनिवारी सायं ३ वाजता सहा ब्राम्हणाना बोलावून त्यांच्याकडून विधिवत पूजा करून महाराजांची स्थापन करण्यात येणार आहे. तसेच महाराजांच्या या पुतळ्याचे यावेळी मोठ्या उत्साहात अनावरणही करण्यात येणार आहे.
शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
दरम्यान आज महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असून यावेळी तालुक्यातील तसेच अन्य भागांतील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील नगराध्यक्ष चव्हाण यांनी केले आहे.