For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वर्ल्डकपमध्ये उलटफेर, अमेरिकेने उडवला पाकचा धुव्वा

06:59 AM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
वर्ल्डकपमध्ये उलटफेर  अमेरिकेने उडवला पाकचा धुव्वा
Advertisement

सुपर ओव्हरमध्ये मिळवला धमाकेदार विजय : नितीश कुमार, सौरभ नेत्रावळकर, मोनांक पटेल ठरले विजयाचे शिल्पकार

Advertisement

वृत्तसंस्था/ डलास

टी-20 वर्ल्डकपमध्ये मोठा उलटफेर करताना सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव करत इतिहास रचला आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 159 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल अमेरिकेचा संघही 159 धावांपर्यंतच पोहचू शकला. यानंतर सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने एका विकेटच्या मोबदल्यात 18 धावा केल्या. पाकिस्तानला एक विकेट गमावून केवळ 13 धावा करता आल्या. पाकिस्तानवरील या शानदार विजयासह अ गटात अमेरिकेचा संघ 4 गुणासह अव्वलस्थानी विराजमान आहे.

Advertisement

प्रारंभी, अमेरिकेने नाणेफेक जिंकत पाकला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. पाकच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मोहम्मद रिझवान 9 धावांवर बाद झाला. उस्मान खान (3) व फखर झमन (11) हे दोघे देखील स्वस्तात बाद झाल्याने पाकची 3 बाद 26 अशी स्थिती झाली होती. पण, कर्णधार बाबर आझम व शादाब खान यांनी 72 धावांची भागीदारी साकारली. शादाब खानने 25 चेंडूत 40 धावांचे योगदान दिले तर बाबर आझमने 43 चेंडूत 44 धावा केल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर इफ्तिकार अहमद 18 व शाहिन शाह आफ्रिदी नाबाद 25 यांनी फटकेबाजी करत संघाला 20 षटकांत 7 बाद 159 धावापर्यंत मजल मारुन दिली.

पाकिस्तानने दिलेल्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार मोनांक पटेल आणि स्टीवन टेलर यांनी 36 धावांची भागीदारी केली. सहाव्या षटकात टेलर 12 धावा काढून बाद झाला. पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर अमेरिकेने पॉवरप्लेमध्ये एक विकेटच्या मोबदल्यात 44 धावा केल्या. यानंतर  मोनांकने एंड्रीज गौस याच्यासोबत डावाला आकार दिला. दुसऱ्या विकेटसाठी या दोघांत 68 धावांची महत्वाची भागिदारी झाली. 14 व्या षटकात हॅरिस रौफने गौसला 35 धावांवर बाद केले. यानंतर मोहम्मद आमीरने जम बसलेल्या मोनांकला तंबूत पाठवले. अर्धशतकानंतर मोनांक बाद झाला. अमेरिकेला अखेरच्या पाच षटकात विजयासाठी 45 धावांची गरज होती. कॅनडाविरोधात शतक ठोकणारा अॅरोन जोन्स मैदानात होता. त्यानं पाकिस्तानच्या हातून सामना हिरावला. अखेरच्या दोन षटकात अमेरिकेला 21 धावांची गरज होती. आमीरने 19 व्या षटकात फक्त 6 धावा दिल्या. अखेरच्या षटकात 15 धावांची गरज होती. पाकिस्तानकडून हॅरीस रौफ गोलंदाजीला आला. जोन्स व नितीश कुमार यांनी रौफच्या षटकात 14 धावा वसूल केल्या. त्यामुळे सामना टाय झाला.

संक्षिप्त धावफलक :

पाकिस्तान 20 षटकांत 7 बाद 159 (बाबर आझम 44, शादाब खान 40, अहमद 18, शाहिन आफ्रिदी नाबाद 23, केन्झिंगे तीन बळी, नेत्रावळकर 2 बळी).

अमेरिका 20 षटकांत 3 बाद 159 (मोनांक पटेल 50, गौस 35, अॅरॉन जोन्स नाबाद 36, नितीश कुमार नाबाद 14, आमीर, नसीम शाह व हॅरिस रौफ प्रत्येकी एक बळी).

सुपर ओव्हरचा थरार अन पाकचा पराभव

सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने प्रथम फलंदाजी केली. अॅरॉन जोन्सने मोहम्मद आमिरच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला. दुसऱ्या चेंडूवर त्याला दोन धावाच करता आल्या. तिसऱ्या चेंडूवर सिंगल घेतली. आमिरने पुढचा चेंडू वाईड फेकला. या वाईड चेंडूवर हरमीत सिंहने एक धाव घेतली. चौथ्या चेंडूवर जोन्सने पुन्हा एक धाव घेतली. आमिरनं पुन्हा एकदा वाईड चेंडू फेकला. वाईड चेंडूवर दोन धावा घेतल्या. पाचव्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. सहावा चेंडू फेकण्याआधी आमिरने पुन्हा एक वाईड चेंडू फेकला. यावर पुन्हा दोन धावा घेण्यात आल्या. अखेरच्या चेंडूवर आमिरने एक धाव घेतली. सुपर ओव्हरमध्ये युएसएने 18 धावा केल्या. पाकिस्तानला विजयासाठी 19 धावा मिळाल्या होत्या. अमेरिकेकडून नेत्रावळकरने पहिला चेंडूवर निर्धाव फेकला. दुसऱ्या चेंडूवर इफ्तिखार अहमदने चौकार ठोकला. पुढचा चेंडू नेत्रावळकरने वाईड फेकला. पण पुढच्याच चेंडूवर इफ्तिखार बाद झाला. नेत्रावळकरने वाइड फेकला. त्यानंतर पुढील चेंडूवर पाकिस्तानला लेग बायचा चौकार मिळाला. पाचव्या चेंडूवर प्दोन धावा आल्या. अखेरच्या चेंडूवर फक्त एकच धाव मिळाली. सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला 13 धावा करता आल्या.

Advertisement
Tags :

.