महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

2024 मध्ये ‘बिर्याणी’चाच जलवा...

06:31 AM Jan 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतीय हे खाण्याच्याबाबतीत नेहमीच आघाडीवर असतात. भारतात दक्षिणेपासून ते अगदी उत्तरेपर्यंतच्या पसरलेल्या विविध राज्यांमध्ये स्वत:ची खाद्यसंस्कृती बहरलेली आहे. देशात कुठेही गेलात हॉटेलात ऑर्डर नोंदवण्यासाठी तर आधी आपण तेथील मेन्यूकार्ड मागवतो. त्यात सर्व पदार्थांच्या यादीत दक्षिण भारतीय (साऊथ इंडियन), उत्तर भारतीय (नॉर्थ इंडियन) खाद्यपदार्थाचा बहुतेककरुन उल्लेख असतोच. सरत्या वर्षामध्ये लोकांनी काय काय खाल्लं या संदर्भातला एक आढावा नुकताच घेण्यात आला होता. त्यामध्ये बिर्याणीची ऑर्डर ग्राहकांनी सर्वाधिक नोंदली होती, असे पहायला मिळाले. यासोबतच नाश्त्यामध्ये इडली आणि डोसा यांची ऑर्डरदेखील सर्वाधिक नोंदली गेली. उत्तर भारतीय पदार्थ आणि फास्ट फूडला देखील ग्राहकांनी पसंती दर्शवली होती.

Advertisement

एकंदर मागच्या 2024 या वर्षाचा आढावा घेतला गेला तेव्हा यामध्ये इतर पदार्थांच्या तुलनेत बिर्याणीच लाखो खवय्यांच्या पसंतीची ठरली. स्विगी या प्लॅटफॉर्मवरती जवळपास 83 दशलक्ष इतक्या ग्राहकांनी बिर्याणीची ऑर्डर नोंदवली होती, अशी माहिती मिळते आहे. झोमॅटो या आणखी एका प्लॅटफॉर्मकडून सुद्धा बिर्याणीची सर्वाधिक मागणी यावर्षी नोंदवण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यांनी आपली ऑर्डरची आकडेवारी मात्र जाहीर केलेली नाही. दक्षिण भारतातील खवय्यांनी 8.5 दशलक्ष डोसा आणि 7.8 दशलक्ष इडलींची ऑर्डर नोंदवली होती. या पदार्थांची ऑर्डर नोंदवण्यासाठी विविध खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या प्लॅटफॉर्मचा वापर केला होता. डोशाचा विचार करता मसाला डोसा हा सर्वाधिक पसंतीचा होता. तर उत्तर भारतामध्ये विचार करता दिल्ली, चंदीगड, कोलकत्ता या ठिकाणी मात्र छोले भटूरे, आलू पराठा आणि कचोरी सारख्या खाद्यपदार्थांना ग्राहकांची पसंती होती. दक्षिण व उत्तर भारत विभागवार खाद्यपदार्थांची आवड ही वेगवेगळ असल्याकारणाने वरील दोन विभागांमध्ये खाद्यपदार्थांच्या ऑर्डरमध्ये वैविध्य पाहायला मिळते. जेवणाची ऑर्डर नोंदवण्यामध्ये ग्राहकांनी गेल्यावर्षी चांगलाच प्रतिसाद नोंदवला आहे. जवळपास 215 दशलक्ष ऑर्डर्स रात्रीच्या जेवणाच्या (डिनर)ग्राहकांनी नोंदवल्या होत्या. दुपारच्या जेवणाच्या ज्याला आपण सहसा लंच असे म्हणतो, याच्या तुलनेमध्ये 29 टक्के इतकी जास्त ऑर्डर रात्रीच्या जेवणाची होती. यामध्ये बिर्याणीचा क्रमांक वरचा लागतो. रेल्वे प्रवासामध्ये देखील प्रवाशांनी बिर्याणीचीच अधिक मागणी केली होती. स्विगीची रेल्वेशी संबंधित आयआरसीटीसी या संस्थेशी भागीदारी असून या मार्फत स्विगी ही आपली बिर्याणीची ऑर्डर नोंदवत असते. रात्रीच्या जेवणामध्ये ग्राहकांनी चिकन बर्गरची मागणी केली होती. 1.8 दशलक्ष ग्राहकांनी चिकन बर्गरची मागणी केली होती. असं जरी असलं तरी अडीच दशलक्ष इतक्या ग्राहकांनी मागणी केली होती चिकन रोल्सची. याचप्रमाणे दहा मिनिटांच्या डिलिव्हरी संदर्भातील ऑर्डर नोंदवताना रसमलाई, सिताफळ आईक्रीम या गोष्टी सर्वाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. जवळपास 1.9 अब्ज किलोमीटरचा प्रवास या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी या पदार्थांच्या डिलिव्हरीकरता केला होता अशीही माहिती मिळते आहे. 2024 च्या अखेरच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबरला तर खाद्यपदार्थांची ऑर्डर पोहचवण्याची मोठी लगबग दिसून आली. वरील खाद्यपदार्थांसोबत विविध शहरात शेवटच्या दिवशी चॉकलेट, चिप्स आणि सॉफ्टड्रिंक्सची ग्राहकांनी ऑर्डर देऊ केली होती. काहींनी तर बर्फाचीही ऑर्डर नोंदवली. एक मजेशीर बाब ही की 31 डिसेंबरला द्राक्षांची मागणीही केली गेली होती. क्वीक कॉमर्स कंपन्यांनीही ही ऑर्डर पाहून आश्चर्य व्यक्त केलं होतं. स्पेनमध्ये नव्या वर्षाच्या प्रारंभी द्राक्षे खाणे शुभ मानले जाते, असा संदेश पाहून अनेकांनी द्राक्षांची ऑर्डर नोंदवली होती, अशी माहिती मिळते आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article