For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शाहबाज सरकारसोबत चर्चेस इम्रान तयार

06:28 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
शाहबाज सरकारसोबत चर्चेस इम्रान तयार
Advertisement

देशाच्या कल्याणाकरता निर्णय घेतल्याचा दावा

Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयचे अध्यक्ष गौहर अली खान यांनी तुरुंगात कैद इम्रान खान हे मागील घटना पूर्णपणे विसरण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले आहे. गौहर अली खान यांनी इम्रान यांची तुरुंगात भेट घेतल्यावर हे वक्तव्य केले आहे. इम्रान आता शाहबाज शरीफ सरकारसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे समारे आले आहे.

Advertisement

इम्रान यांना शाहबाज शरीफ सरकारकडून कुठलाही प्रस्ताव देण्यात आलेला नाही. इम्रान यांनी वारंवार चर्चा व्हायला हवी अशी भूमिका मांडली आहे. देशाकरता ते सर्वांना माफ करण्यास तयार आहेत. इम्रान यांना त्यांच्या मुलाची भेट घेण्याचीही अनुमती देण्यात आली नसल्याचे गौहर यांनी सांगितले आहे.

इम्रान यांना तुरुंगातून बाहेर आणण्यासाठी कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यापूर्वी न्यूयॉर्क येथे झालेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरमयान स्टेडियमवरील आकाशात ‘इम्रान खान यांची मुक्तता करा’ या आशायच्या बॅनरसह एक विमान उड्डाण करताना दिसून आले होते.

10 महिन्यांपासून तुरुंगात

इम्रान खान हे 10 महिन्यांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहेत. त्यांना सर्वप्रथम नजराणा प्रकरणी 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानातील निवडणुकीच्या काही दिवस अगोदर खान यांना 3 प्रकरणांमध्ये एकूण 31 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. यात नजराण्यांशी निगडित एक प्रकरण तसेच बुशरा यांच्यासोबतच्या बेकायदेशीर विवाहाचे प्रकरण सामील आहे.

सैन्यासोबत डील करणार

इम्रान यांनी सैन्यासोबत ‘डील’ केली तर ते पंतप्रधान होतील. अशा स्थितीत पंतप्रधान शाहबाज यांना सत्तेवर आणणाऱ्या लोकांकडूनच धोका आहे असे पीटीआयचे नेते फवाद चौधरी यांनी म्हटले होते. इम्रान आणि सैन्य यांच्यात चर्चा सुरू असल्याचे वृत्त मागील महिन्यात समोर आले होते. पीटीआयचे नेते शहरयार आफ्रिदी यांनी लवकरच सैन्यप्रमुख आणि आयएसआय प्रमुखांशी पक्ष चर्चा करणार असल्याचा दावा केला होता.

Advertisement
Tags :

.