महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इम्रान मुजावरने मारले कुर्लीचे मैदान

10:29 AM Oct 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मल्ल राम पोटरेला केले चीतपट : हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त कुस्तीच्या मैदानाला शौकिनांचा प्रचंड प्रतिसाद

Advertisement

वार्ताहर/निपाणी

Advertisement

कुर्ली-आप्पाचीवाडीचे आराध्य दैवत श्री हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य जंगी कुस्ती मैदानात कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा इमरान मुजावर इस्लामपूरने शाहूपुरीच्या राम पोटरे याला कोंद एकचाक डावावर चीतपट करुन उपस्थित कुस्ती शौकीनांची मने जिंकली. तर सेनादलाच्या निगवे खालसाच्या सोनबा गोंगाणेने बेळगावच्या संदीप हळदुंडकरवर नेत्रदीपक विजय मिळवला. श्री हालसिद्धनाथ यात्रा उत्सवाच्या निमित्ताने कुर्ली येथे शिंत्रे आखाडा या ठिकाणी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते. प्रमुख कुस्ती गंगावेश तालमीचा इमरान मुजावर इस्लामपूर व शाहूपुरी कोल्हापूरच्या राम पोटरे ही कुस्ती मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. 15 व्या मिनिटाला इमरान मुजावरने एकेरी पट काढत राम पोटारेला खाली घेत कोंद एकचाकावर फिरवून आसमान दाखवत उपस्थित कुस्ती शौकिनांची मने जिंकली.

दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत सेनादल निगवे खालसाचा मल्ल सोनबा गोंगाणेने सेनादल बेळगावचा मल्ल संदीप हळदुंडकरला दोन्ही हाताचे हप्ते भरुन हप्तेडावावर चीतपट करत विजय मिळविला. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती तळंदगेचा मल्ल पृथ्वीराज खरातने भिवशीचा मल्ल महादेव पाटीलला सालतो डावावर चीतपट करत बाजी मारली. चौथ्या क्रमांकाची कुस्ती मल्ल  कर्नाटकच्या प्रकाश इंगळगीने आपल्या प्रतिस्पर्ध्याला हप्ते डावावर चीत पट करुन उपस्थितांची वाहवा मिळवली. पाचव्या क्रमांकाची कुस्ती किरण पाटीलने जिंकली. सहाव्या क्रमांकाची कुस्ती सचिन शिंदे कर्नाटकने जिंकली. सातव्या क्रमांकाची कुस्ती अतुल मगदूम इस्पुरलीने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना चीत करत जिंकली.

बक्षीस वितरण युवा नेते उत्तम पाटील, अॅड. संजय शिंत्रे, निरंजन पाटील, गजानन कावडकर, अरुण निकाडे, अजय पाटील, निवास पाटील, वस्ताद किसन चव्हाण, राघू निकाडे, राजेंद्र डगे, दत्ता पाटील, बाळू माळी, बाळासो पानारे, वासु दिवटे, शंकर कमते, दत्ता कोकीतकर, अण्णासो माळी, लक्ष्मण नेजे, नेता घराळे, दिनकर पोवार, विठ्ठल पाटील, शामराव पाटील, मधुकर पाटील, नागेश माळी यांच्यासोबत कुस्ती कमिटीचे सदस्य, कुस्ती शौकीन उपस्थित होते. कुस्ती मैदानात कुस्ती समालोचक कृष्णात चौगुले यांनी लक्ष्यवेधी समालोचन करत उपस्थित शौकिनांची कुस्ती परंपरेविषयी माहिती सांगितली तर मैदानात किरण गोंधळी याने हलगी वादनातून मैदानातील खेळाचा ठेका वाढवला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article