महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इम्रान खान, बुशरा बीबी तुरुंगातच राहणार!

06:34 AM Jul 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तुरुंगातून बाहेर पडताच पुन्हा अटकेची कारवाई

Advertisement

► वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

Advertisement

एका प्रकरणात तत्काळ सुटकेचे आदेश मिळताच तुऊंगातून बाहेर पडलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. यावेळी तोशाखाना भ्रष्टाचाराच्या नव्या प्रकरणात इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना ‘एनएबी’ने शुक्रवारी सायंकाळी अटक केली आहे. या कारवाईपूर्वी इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीला शनिवार, 13 जुलै 2024 रोजी सकाळी बनावट निकाह प्रकरणातून न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते.

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना एनएबी अधिकारी मोहसिन हारून यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अटक केल्यानंतर त्यांची रवानगी अदियाला तुऊंगात करण्यात आली आहे. तोशाखाना प्रकरणत तपासात इम्रान खानवर बेकायदेशीरपणे महागडी घड्याळे, दागिने आणि इतर भेटवस्तू बाळगल्याचा आणि विकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात गेल्या आठवड्यातच त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले होते. इम्रान खान यांच्यासोबतच बुशरा बीबीला अधिकाऱ्यांना सहकार्य न केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. यावषी मे महिन्यात इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीविरोधात तोशाखान्याच्या गैरवापराचे नवे प्रकरण समोर आले होते. यापूर्वी, 31 जानेवारी 2024 रोजी न्यायालयाने तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात इम्रान खान आणि बुशरा बीबी यांना दोषी ठरवले होते. दोघांनाही 14 वर्षांची शिक्षा सुनावली होती.

इस्लामाबादच्या एका न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांची इद्दत निकाह प्रकरणात निर्दोष मुक्तता करतानाच त्यांच्या सुटकेचा आदेश जारी केला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article