कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ईपीएफओ ट्रान्सफर प्रणालीत सुधारणा

06:33 AM Nov 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नोकरी बदलल्यानंतर 2-3 दिवसात बॅलन्स नवीन खात्यात जमा होणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) लाखो नोकरदारांसाठी एक मोठा दिलासा जाहीर केला आहे. 2025 पासून पीएफ बॅलन्स ट्रान्सफर प्रणाली आता स्वयंचलित म्हणजेच ऑटोमॅटिक होणार आहे. या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना आता ‘फॉर्म 13’ भरण्याची किंवा नोकरी बदलल्यानंतर पीएफ ट्रान्सफरसाठी अनेक महिने वाट पाहण्याची आवश्यकता भासणार नाही.

ईपीएफओने आता एक ऑटोमॅटिक ट्रान्सफर सिस्टम सुरू केली असून ती 2025 पर्यंत पूर्णपणे लागू केली जाईल. या प्रणालीमुळे लाखो कर्मचाऱ्यांचे पीएफ बॅलन्स स्वयंचलितपणे नवीन नियोक्त्याच्या खात्यात ट्रान्सफर होईल. यापूर्वी नोकरी बदलताना, कर्मचाऱ्यांना ‘फॉर्म 13’ भरावा लागत असे. त्यानंतर जुन्या आणि नवीन नियोक्त्यांकडून पडताळणी अत्यावश्यक होती. या प्रक्रियेला 1-2 महिने जात होते. या प्रक्रियेदरम्यान दावे अनेकदा नाकारले जात होते किंवा कर्मचाऱ्यांच्या रकमेवरील व्याज कमी होत होते. मात्र, आता ही सुविधा सुकर करण्यात आली आहे. साहजिकच नवीन नियमांमुळे अनेक समस्या दूर होतील.

डिजिटल इंडियाच्या दिशेने पाऊल

या सुविधेचा लाभ 10 कोटींहून अधिक सदस्यांना हेणार असल्याचा दावा ईपीएफओने केला आहे. ही यंत्रणा स्वयंचलित हस्तांतरण, कागदविरहित आणि जलद सेवा प्रदान करेल. तसेच युएएन क्रमांक आधारशी जोडल्याने फसवणूक देखील रोखली जाईल, असेही सांगण्यात आले. ईपीएफओ संपूर्ण प्रणाली डिजिटल करण्यासाठी काम करत आहे. येत्या काळात पीएफ रक्कम काढणे देखील स्वयंचलित होऊ शकते. जर तुमचा युएएन क्रमांक जुना असेल तर ईपीएफओ अॅप किंवा वेबसाइटला भेट देऊन ते अपडेट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नवीन नोकरीत सामील होण्यापूर्वी आपले जुने पीएफ खाते बंद झाले आहे का ते तपासा. यामुळे कर्मचाऱ्यांची निवृत्ती निधी सुरक्षित राहील, असे आवाहनही ईपीएफओकडून करण्यात आले आहे.

नवीन प्रणाली प्रक्रिया...

► कर्मचारी नवीन नोकरीत सामील होताच नवीन नियोक्ता त्याचा यूएएन लिंक करेल.

► ईपीएफओ पोर्टलवर आधार आणि केवायसीद्वारे ऑटो-व्हेरिफिकेशन केले जाईल.

► जुन्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम थेट नवीन खात्यात हस्तांतरित होईल.

► कोणतीही कागदपत्रे लागणार नसल्याने हस्तांतरण 3 ते 5 दिवसांत पूर्ण होईल.

► मुख्य अट : युएएन सक्रिय करणे आणि आधारशी लिंक करणे अत्यावश्यक.

कर्मचाऱ्यांना होणारे फायदे

► पीएफ हस्तांतरण प्रक्रियेतील विलंब टळणार असल्याने दिलासा.

► कोणतीही कागदपत्रे अपलोड होणार नाहीत; प्रक्रिया स्वयंचलित.

► व्याज चालू राहिल्यामुळे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही.

► पीएफ खात्यातील संपूर्ण रक्कम एकाच ठिकाणी प्राप्त होईल.

► नोकरी बदलताना पीएफ रकमेची काळजी करावी लागणार नाही.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article