उत्पादन पीएमआय निर्देशांकात सुधारणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील निर्मिती प्रक्रियेला गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये कमालीचा वेग आल्याचे पहायला मिळाले आहे. फेब्रुवारीमध्ये भारताच्या उत्पादन निर्देशांकाने 56.9 वर पोहोचण्यात यश मिळविले आहे. गेल्या पाच महिन्यामध्ये पाहता फेब्रुवारीमध्ये उत्पादनामध्ये सर्वाधिक वेग आला होता. एचएसबीसी इंडिया यांनी वरील आकडेवारी जाहीर केली आहे. मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये उत्पादन पीएमआय निर्देशांक 55.5 वर होता. त्यानंतर जानेवारीत तो 56.5 इतका होता. सप्टेंबरनंतर पाहता मागच्या दोन महिन्यामध्ये उत्पादनाने वेग घेतला आहे.
विक्रीमध्येदेखील कमालीची वाढ झाल्याने कंपन्यांना उत्पादनाच्या निर्मितीवर भर देणे क्रमप्राप्त ठरले होते. उद्योग विस्तारामुळे विविध कंपन्यांना नव्या ऑर्डर्स प्राप्त होऊ लागल्या आहेत. देशांतर्गत आणि विदेशातूनदेखील उत्पादनाच्या निर्मितीकरिता ऑर्डर्स येऊ लागल्या आहेत.