For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

महत्वाची बातमी! कर्ज महागणार, रेपो दरात अर्धा टक्क्यांची वाढ

10:38 AM Jun 08, 2022 IST | Abhijeet Khandekar
महत्वाची बातमी  कर्ज महागणार  रेपो दरात अर्धा टक्क्यांची वाढ

मुंबई : रिझर्व्ह बँकेकडून आज पतधोरण आज जाहीर केले. त्यानुसार कर्ज महागणार असून कर्जदारांच्या खिशातून नाही अर्धा टक्यांचे पैसे वसूल केले जाणार आहेत. बँकेने आज जाहीर केलेल्या रेपो दरात ०.५० टक्के वाढ केली असून रिझर्व्ह बँकेचा रेपो दर ४.९० टक्के झाला आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा व्याजदर वाढ झाल्याने कर्जदारांना जोरदार झटका दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर आज बुधवारी गव्हर्नर शक्तिकांत दास कर्जदारांना धक्का देत रेपो वाढीची घोषणा केली.

Advertisement

या दरवाढीनंतर रेपो दर ४.९० टक्के झाला आहे. स्टॅंडिंग डिपाॅझिट फॅसिलीटी रेट ४.१५ टक्के झाला होता. बँक रेट ४.१५ टक्के आणि सीआरआर अर्धा टक्क्याने वाढून ४.५० टक्के झाला. त्यापूर्वी ८ एप्रिल २०२२ रोजी रिझर्व्ह बँकेने पतधोरण स्थिर ठेवले होते.

https://twitter.com/RBI/status/1534015021956538370

Advertisement

आरबीआय पतधोरण समितीची सध्या सुरु बैठक सुरु आहे. या बैठकीत रेपो दरात आणखी ०.४० टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज ब्रोकरेज संस्थांनी व्यक्त केला आहे. याशिवाय ऑगस्टच्या आढाव्यात आणखी ०.३५ टक्क्यांनी वाढू शकते. असे न झाल्यास आरबीआय पुढील आठवड्यात ०.५० टक्के आणि ऑगस्टमध्ये ०.२५ टक्के वाढ करण्याचे ठरवू शकते. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अलीकडेच सांगितले होते की, चलनवाढीचा दर ६ टक्क्यांच्या समाधानकारक पातळीवर आणण्याचा दबाव पाहता, पॉलिसी रेट वाढण्याची शक्यता वाढली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.