For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पश्चिम बंगालसाठी निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

06:08 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
पश्चिम बंगालसाठी निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
Advertisement

निवडणुकीकरता वापरण्यात येणाऱ्या सर्व वाहनांवर जीपीएस : सुरक्षा दलांच्या आणखी 100 तुकड्या तैनात

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीकरता वापरण्यात येणाऱ्या सर्व वाहनांमध्ये जीपीएस बसविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. जीपीएसच्या मदतीने संबंधित सर्व वाहनांना ट्रॅक केले जाणार आहे. निवडणूक कार्यात सामील कर्मचाऱ्यांना यासंबंधी कळविण्यात आले आहे.

Advertisement

जीपीएसद्वारे ईव्हीएमसमवेत निवडणूक सामग्रीच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. तसेच स्ट्राँगरुममध्ये नेताना या सामग्रीत कुठलाही फेरफार होणार नाही हे सुनिश्चित केले जाणार असल्याचे आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

निवडणूक आयोगाने यावरून प्रशासनाला कठोर निर्देश दिले आहेत. आयोगाने राज्यातील शिक्षण विभागाचे संयुक्त सचिव अर्णव चॅटर्जी यांना संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. तर दुसरीकडे आयोगाने गृह मंत्रालयाला पश्चिम बंगालमध्ये आणखी 100 निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्याचा निर्देश दिला आहे. 15 एप्रिल किंवा त्यापूर्वी या तुकड्या तैनात करण्यात याव्यात असे आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशावर गृह मंत्रालय सीआरपीएफच्या 55 तुकड्या आणि सीमा सुरक्षा दलाच्या 45 तुकड्या पश्चिम बंगालमध्ये तैनात करणार आहे.

Advertisement
Tags :

.