महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहरातील रस्त्यांवर नव्याने नो पार्किंग झोनची अंमलबजावणी

11:23 AM Nov 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पोलीस आयुक्तांकडून जुन्या आदेशात बदल : शहरातील वाहतूक व्यवस्थेत अनेक फेरफार होणार

Advertisement

बेळगाव : वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नो पार्किंग, पार्किंग व वन वे, नो एंट्रीमध्ये बदल करण्यात आला आहे. यासंबंधी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी जुन्या आदेशात बदल करून नवा आदेश जारी केला आहे. त्यामुळे यापुढे वाहतूक व्यवस्थेत अनेक बदल असणार आहेत. वाहतूक उत्तर व दक्षिण विभाग पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात अनेक ठिकाणी हा बदल करण्यात आला आहे. वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करून नवा आदेश जारी करण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार चन्नम्मा चौकापासून डॉ. बी. आर. आंबेडकर उद्यानापर्यंत, कोल्हापूर सर्कलपासून शिवबसवनगर क्रॉसपर्यंत, कोल्हापूर सर्कलपासून संगोळ्ळी रायण्णा सर्कलपर्यंत, चन्नम्मा सर्कलपासून संगोळ्ळी रायण्णा सर्कलपर्यंत, संगोळ्ळी रायण्णा सर्कलपासून किल्ला सर्कलपर्यंत, किल्ला सर्कलपासून कनकदास सर्कलपर्यंत, किल्ला तलावापासून जुने गांधीनगर क्रॉसपर्यंत, सर्किट हाऊसपासून मुजावर खूटपर्यंत, मध्यवर्ती बसस्थानकापासून व्हीआरएल लॉजिस्टीकपर्यंत, धर्मनाथ भवनपासून पोलीस मुख्यालयापर्यंत (न्याय मार्ग), रामदेव हॉटेल क्रॉसपासून धर्मनाथ भवनपर्यंत वाहने उभी करण्यास मनाई असणार आहे.

Advertisement

चन्नम्मा सर्कलपासून कीर्ती हॉटेलपर्यंत रस्त्याच्या पूर्व बाजूला, कॉलेज रोडवर रस्त्याच्या पूर्व बाजूला, अपोलो फार्मसी ते पवन हॉटेलपर्यंत पूर्व बाजूला, चन्नम्मा सर्कलपासून इंडियन ऑईल पेट्रोलपंप-धर्मवीर संभाजी चौकपर्यंत रस्त्याच्या पश्चिम बाजूला, आरपीडी सर्कलपासून अनगोळ नाकापर्यंत पूर्व बाजूला, कॅम्प येथील हॅवलॉक रोड, कॅम्प पेट्रोलपंपपासून फिशमार्केट क्रॉसपर्यंत खानापूर रोडवर दोन्ही बाजूला, गोगटे सर्कलपासून पंजुर्ली हॉटेलपर्यंत खानापूर रोडवर पूर्व बाजूला, लेंडीनाला ब्रिजपासून बळ्ळारी नाल्यापर्यंत जुन्या पी. बी. रोडवर वाहने उभी करण्यास मनाई आहे. पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातील सर्व सर्कलपासून 50 मीटर अंतरावर कोणत्याच प्रकारची वाहने उभी करता येणार नाहीत. सर्व सर्कलपासून 50 मीटर अंतरापर्यंतचा परिसर नो पार्किंग झोन असणार आहे. या परिसरात पार्किंगमुळे वाहतुकीस व्यत्यय होणार आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article