‘मत्स्यसंपदा’ प्रकल्पांची पीएसयूद्वारे अंमलबजावणी
मत्स्यव्यवसाय खात्याकडून निविदा जारी
प्रतिनिधी/ पणजी
पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेमधील विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) नियुक्त करण्याच्यादृष्टीने मत्स्यव्यवसाय संचालनालयाने निविदा मागविल्या आहेत. योजनेतील प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी प्रकल्प कार्यकारी एजन्सी म्हणून सदर पीएसयू काम करणार आहेत.
सरकारच्या ई-निविदा प्रणालीच्या माध्यमातून दि. 24 नोव्हेंबर दुपारी 1 वाजेपर्यंत या निविदा डाऊनलोड करता येणार असून त्याच दिवशी दुपारी 3 पर्यंत त्या सादर कराव्या लागणार आहेत. निविदेसोबत सुरक्षा ठेव म्हणून एक लाख ऊपये भरावे लागणार आहेत.
दरम्यानच्या काळात बोलिदारांना काही प्रश्न विचारायचे असतील तर दि. 23 नोव्हेंबरपूर्वी त्यांनी ते खात्याच्या ईमेल पत्त्यावर सादर करता येणार आहेत. त्यानंतर दि. 27 रोजी दुपारी 3 वाजता निविदा उघडण्यात येणार आहेत. प्राथमिक स्वरूपातील प्रस्ताव हा कामाची मान्यता देणारे पत्र जारी करण्यात येईपर्यंत 180 दिवसांसाठी वैध राहणार असल्याचे निविदेत म्हटले आहे.