महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिल्लीत राष्ट्रपती राजट लागू करा

06:16 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजप आमदारांची मागणी : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली भेट

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीतील भाजप आमदारांनी अरविंद केजरीवाल सरकार बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. यासंबंधी दिल्लीतील भाजप आमदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत त्यांना निवेदन सोपविले होते. आता राष्ट्रपती सचिवालयाने याची दखल घेतली आहे. भाजप आमदारांनी घटनात्मक संकटाचा दाखला देत दिल्ली सरकार बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. पत्रात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तुरुंगात असल्याचा दाखलाही देण्यात आला आहे. तर राष्ट्रपती कार्यालयाने हे पत्र केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठविले आहे.

या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आता राजधानी दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजप आमदारांच्या या निवेदनाला राष्ट्रपती सचिवालयाकडून केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठविण्यात आल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे. दिल्लीत सुरु असलेल्या घटनात्मक संकटावर योग्य लक्ष देण्याची गरज असल्याचे सचिवालयाचे म्हणणे आहे.

दिल्ली सरकार बडतर्फ करण्याच्या मागणीसह भाजप आमदारांनी 30 ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींची भेट घेतली होती. यासंबंधी त्यांना निवेदन सोपविण्यात आले होते. भाजप नेते विजेंद्र गुप्ता यांच्या नेतृत्वात भाजप आमदारांनी ही मागणी केली होती. दरवेळी पावसात दिल्ली पाण्यात बुडते. आयुष्मान भारत योजना दिल्लीत लागू झालेली नाही आणि हजारो कोटीचा निधी बंद झाला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तुरुंगात असल्याने राज्य सरकार कामच करत नसल्याचे चित्र आहे. दिल्लीच्य जनतेच्या लाभासाठी सरकारचे कामकाज आणि विकासकामे सुरू व्हावीत म्हणून आम्ही राष्ट्रपतींकडे दिल्ली सरकार बडतर्फ करण्याची विनंती करत आहोत असे गुप्ता यांनी म्हटले आहे.

दिल्ली जल बोर्ड कर्जात बुडाले

विजेंद्र गुप्ता यांनी भाजप आमदार तसेच माजी आप आमदार आणि माजी मंत्री राजकुमार गौतम यांच्यासोबत राष्ट्रपतींची भेट घेतली होती. अरविंद केजरीवालांनी दिल्लीवासीयांचे हाल चालविले आहेत. कारण कुठलाही शासकीय विभाग योग्यप्रकारे काम करत नसल्याची स्थिती आहे. दिल्ली जल बोर्ड कर्जात बुडाले आहेत. रस्त्यांची अवस्था बिकट असून घोटाळ्यावर घोटाळे होत आहेत. गजाआड राहूनही सत्तेवर राहण्याच्या हट्टामुळे राष्ट्रीय राजधानीत अनेक समस्या निर्माण झाल्याचा आरोप गुप्ता यांनी केला आहे.

न्यायालयाने फेटाळली याचिका

केजरीवालांना दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने 21 मार्च रोजी अटक केली होती. मग सीबीआयने भ्रष्टाचार प्रकरणी त्यांना तिहार तुरुंगातूनच 26 जून रोजी अटक केली होती.  सीबीआय प्रकरणी अटकेला आव्हान देणाऱ्या केजरीवालांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.  तर केजरीवालांना मुख्यमंत्री पदावरून हटविण्याची मागणी करणारी याचिका दोनवेळा फेटाळण्यात आली आहे.

आप संतप्त

भाजपने आताच पराभव पत्करायचा आहे का चार महिन्यांनी हे ठरवावे. निवडणुकीच्या तारखा उद्या जाहीर करण्यात आल्या तरीही आमच्या पक्षाची तयारी आहे. भाजपला पराभवाची घाई असेल तर लवकर तारीख जाहीर करावी. दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपची इच्छा म्हणजे चार महिन्यांपूर्वी पराभूत होण्यासारखे असल्याचा दावा आप खासदार संजय सिंह यांनी केला आहे. दिल्लीत भाजपचा एक अयशस्वी ठरल्यावर त्याने दुसरा सुरू केला आहे. भाजपने राष्ट्रपती राजवट लागू करविली तर तो पक्ष दिल्लीत एकही जागा जिंकू शकणार नाही असे आप नेत्या आतिशी यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article