शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करा
अनुदानित शाळा पेन्शन वंचित मंचची मागणी
बेळगाव : राज्यातील अनुदानित शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पेन्शनच्या मागणीसाठी शुक्रवारी सुवर्ण विधानसौधसमोर आंदोलन करण्यात आले. दि. 1-4-2006 पूर्वी नियुक्त झालेल्या आणि 1-4-2006 नंतर सरकारी वेतनास पात्र ठरलेल्या शिक्षकांना पेन्शनपासून वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे तातडीने त्यांना पेन्शन मंजूर करावी, अशी मागणी 2006 पूर्वीचे कर्नाटक राज्य अनुदानित शाळा आणि महाविद्यालये पेन्शन वंचित मंचच्यावतीने राज्य सरकारकडे करण्यात आली. बेळगावसह संपूर्ण राज्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. दरवर्षी पेन्शन नसलेले हे कर्मचारी आंदोलन करतात. परंतु, त्यांना अद्याप यश आलेले नाही. पेन्शन नसल्यामुळे निवृत्त झालेल्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने शिक्षकांची ही बाजू समजून घेत तातडीने पेन्शन मंजूर करावी, अशी मागणी करण्यात आली.