For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरकार पुरस्कृत योजना राबवा!

11:43 AM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
सरकार पुरस्कृत योजना राबवा
Advertisement

खासदार जगदीश शेट्टर यांची बँक अधिकाऱ्यांना सूचना

Advertisement

बेळगाव : सरकार पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करून ग्रामीण भागात बँकेच्या शाखा सुरू करा, अशी सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी लीड बँकेच्या अधिकाऱ्यांना केली. पुढील बैठकीत सरकारी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. जि. पं. सभागृहात शुक्रवारी झालेल्या जिल्हास्तरीय बँकर्सच्या बैठकीत (डीसीपी/डीएलआरपी) बोलताना खासदार शेट्टर यांनी आघाडीच्या बँकांच्या अधिकाऱ्यांना सरकार पुरस्कृत योजना राबविण्याचे निर्देश दिले. जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी, बँकांमध्ये प्रलंबित शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांची माहिती लवकर पडताळून पुढील कार्यवाही करावी. शेतकरी व अनुसूचित जाती-जमातींच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी पावले उचलावीत, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीत जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख सुरेश पै यांनी अहवाल  मांडला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अधिकारी पी. बिस्वास, नाबार्डचे डीडीएम  अभिनव यादव, सर्व बँकर्सचे प्रतिनिधी आणि अनुसूचित जाती-जमातीचे नेते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.