कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्वीप अंतर्गत उपक्रम चोखपणे राबवा

11:13 AM May 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्य स्वीप नोडल अधिकारी वस्त्रद यांची अधिकाऱ्यांना सूचना

Advertisement

बेळगाव : निवडणुकीवेळी स्वीपचे उपक्रम व मतदार साक्षरता संघांची भूमिका महत्त्वाची असते. स्वीपचे उपक्रम सुनियोजनपणे राबवून नागरिकांनी अधिक प्रमाणात मतदान करावे याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना राज्य स्वीप नोडल अधिकारी पी. एस. वस्त्रद यांनी अधिकाऱ्यांना केली. जि. पं. सभागृहात बुधवारी झालेल्या स्वीप व मतदार साक्षरता संघाच्या संयुक्त बैठकीमध्ये अध्यक्षस्थानावरून वस्त्रद बोलत होते. जिल्ह्यातील आयएलसी स्वीपच्या उपक्रमांची माहिती वस्त्रद यांनी बैठकीत जाणून घेतली. स्वीप म्हणजे काय? मतदार यादींमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी कोणाशी संपर्क साधावा? निवडणूक आयोग स्थापनचे वर्ष, निवडणूक आयोगाचा अॅप यासंबंधी अधिकाऱ्यांना माहिती देऊन स्वीपचे उपक्रम यशस्वी करण्याची सूचना केली.  जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष तथा जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी मागील लोकसभा निवडणुकीमध्ये बेळगाव व  चिकोडी मतदारसंघात स्वीपचे उपक्रम चोखपणे राबविल्यामुळे मतदानात वाढ झाल्याची माहिती दिली.  जि. पं. चे योजना संचालक रवी बंगारेप्पन्नवर, जिल्हा पी. यु. नोडल अधिकारी एम. ए. मुल्ला, जिल्हा शिक्षणाधिकारी  लीलावती हिरेमठ, राज्य प्रशिक्षक सय्यद मदनभावी, व्हीटीयू स्वीप नोडल अधिकारी अनिल पोळ, आरसीयू स्वीप नोडल अधिकारी व अन्य अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article