Solapur : बनावट अॅपद्वारे अविवाहित मुलींची फसवणूक; तोतया पीएसआयला अटक !
‘जीवनसाथी’ अॅपवर फसवणुकीचा जाळं; तोतया PSI अटकेत
सोलापूर : बनावट जीवनसाथी अॅप तयार करून त्याच्या माध्यमातून अविवाहित मुलींना लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या तोतया पोलीस उपनिरीक्षकास शहर सायबरच्या पोलिसांनी मुंबई येथे अटक केली आहे. वैभव दीपक नारकर (वय-३१, रा. मूळ गोविंद तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी सध्या रा. स्वप्नपूर्ती अपार्टमेंट नायगाव म्हाडा बॉम्बे टाइम मिल कंपाऊंड नायगाव मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अलीकडील काळात सोलापूर शहरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर बाढले आहे. यातील आरोपी हा जीवनसाथी या ऑफर स्वतःची माहिती व ओळख लपवून फिर्यादींना लग्नाची रिक्वेस्ट पाठवत होता. त्यात तो स्वतः पोलीस उपनिरीक्षक व अविवाहित असल्याची माहिती देऊन बनावट बायोडाटा व पत्ता सांगत असे. तसेच तो अंगावर पोलीस उपनिरीक्षकाची वर्दी घालून काढलेला फोटो पाठवत असे.
यात अनेकांच्या कुटुंबाचा विश्वास संपादन करून तो मुंबई येथे पोलीस खात्यात अधिकारी पदावर नोकरीला असल्याचे भासवले. नंतर तो फिर्यादींकडून मावस भावाचा एक्सीडेंट झाला आहे. त्यांच्या उपचारासाठी तसेच मावस भाऊ व मावशी मरण पावलेले आहेत. असे सांगून त्यांच्या अंत्यविधीसाठी पैसे लागणार आहेत, असे सांगून पैसे उकळत होता. असे करून त्याने १९ जुलै ते ८ ऑगस्ट २०२५ पर्यंत ६३ हजार रुपये रक्कम ऑनलाईन वेळोवेळी मागून घेतली. संबंधित तक्रार यांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत सोलापूर शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर एक्सपर्ट टीमने तांत्रिक विश्लेषण व इतर पुरावे तपासून तपास पथक हे मुंबईला रवाना झाले. हे पथक मुंबई येथे जाऊन आरोपी राहत असलेला पत्ता शोधून त्याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता, अशाच प्रकारे सांगून इतर जिल्ह्यातील सात ते आठ मुलींना जीवनसाथी अॅपवर खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच तो अनेक मुलींना पोलीस खात्यात व मंत्रालयामध्ये शासकीय नोकरी लावण्याची आमिष दाखवून त्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, गुन्हे शाखेचे साहेब पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा, पोलीस उपनिरीक्षक नागेश इंगळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मच्छिंद्र राठोड, कृष्णात जाधव, निलेश गंगावणे, नितीन आसवरे यांनी पार पाडली.