रिकाम्या पोटी 'हे' पदार्थ खा! आणि संपुर्ण दिवस ताजेपणा अनुभवा
अभिजीत खांडेकर / तरूण भारत
आपल्या दिवसाची सुरुवात अत्यंत पौष्टिक आणि आतड्यांना सहज पचेल अशा अन्न पदार्थाने केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढून पाचक आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामुळे चांगल्या आरोग्याला भक्कमपणा मिळतो. निरोगी सकाळमध्ये पौष्टिक पदार्थ खाण्याने आपल्याला संपूर्ण दिवसाचाची शक्ती मिळवून देतात. त्याच प्रमाणे शरीरात असणाऱ्या जुनाट रोगांना आणि आजारांना पळवून लावून देतात. सकाळी रिकाम्या पोटी खालीली पदार्थांचे सेवन करा आणि दिवसभर ताजेपणा अनुभवा.
1. बदाम :
बदामांना रात्रभर भिजत ठेवल्याने ते पचण्यास सोपे होऊन त्यातील पोषणपण वाढतो. रिकाम्या पोटी त्यांचे सेवन केल्याने उर्जादायी ठरते तसेच मेंदूच्या आरोग्य चांगले राहून स्मरणशक्ती सुधारते.
2. पपई:
रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने पचनास मदत होते. सूज कमी होऊन व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचा चांगला डोस मिळू शकतो.
3. विविध भाजींचा रस :
रिकाम्या पोटी फळभाजींचा रसाच्य़ा सेवनाने जलद पोषकपणा वाढतो. यामुळे हायड्रेशनला वाढून आणि डिटॉक्सिफिकेशन होऊन शरिरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात.
4. अंजीर आणि मनुका :
रात्रभर भिजवून ठेवल्याने त्यांची पचनशक्ती वाढते. रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके आणि अंजीर खाल्ल्याने जलद उर्जा वाढते. यामुळे पचनास मदत होते आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत होते.
5. बडीशेपचे पाणी :बडीशेपच्या बियांमध्ये विविध संयुगे असतात. ज्यामुळे शरिराला पचनाचे फायदे मिळतात. बडीशेपच्या सेवनाने आतड्यांची सूज आणि पोटात होणारा गॅस कमी होतो. एका बडीशेपच्या बियांचे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने पचनाला चालना मिळून अपचन दूर होते. दिवसाची सुरुवात ताजीतवानी होते.
6. केळी :
रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने जलद ऊर्जा वाढते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत होते. पिकलेल्या केळीमध्ये असणाऱ्या फायबरमुळे शरिरातील कमी पडणाऱ्या घटकांची पुर्तता होते.