महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कामगारांना लादलेल्या अटी तातडीने कमी करा

10:59 AM Sep 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जिल्हा बांधकाम संघटनेचे कामगार आयुक्तांना निवेदन

Advertisement

बेळगाव : बांधकाम कामगारांना विविध अटी घातल्या जात आहेत. त्यामुळे त्यांना नाहक त्रास होत आहे. काम करत असलेल्या कामाला देण्यात आलेला बिल्डिंग परवाना, कंत्राटदाराचा परवाना द्यावा अशी मागणी केली जात आहे. याचबरोबर लग्न, आरोग्य विमा, पेन्शन तसेच प्रसुतीसाठी मिळणारी रक्कम वेळेत दिली जात नाही. या सर्व समस्या दूर करण्याबाबत जिल्हा बांधकाम संघटनेतर्फे मजगाव येथील कामगार कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Advertisement

कामगार कार्ड हवे असेल तर ज्याठिकाणी काम केले जाते. त्या मालकाने इमारत बांधणीसाठी घेतलेला परवाना, कंत्राटदाराचा परवाना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र घरमालक किंवा कंत्राटदार आपला परवाना देण्यास नकार देत आहे. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. कामगाराचे किंवा त्यांच्या मुला-मुलीचे लग्न झाल्यानंतर रक्कम मिळते. मात्र ती रक्कम वेळेत दिली जात नाही. त्यामुळे समस्या निर्माण होत आहे.

कामगाराची पत्नी किंवा मुलीची प्रसुती झाल्यानंतर तातडीने त्यांना दवाखान्याचा खर्च देणे बंधनकारक आहे. याचबरोबर 60 वर्षानंतर पेन्शन देखील लागू केली पाहिजे. इतर कोणताही आजार झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी रक्कमही लवकर दिली पाहिजे. मात्र ती देताना टाळाटाळ केली जात आहे. तेव्हा तातडीने कामगारांच्या या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. कामगार अधिकारी रमेश जाधव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अॅङ एन. आर लातूर, अॅड. किर्ती कांबळे, राहुल पाटील, सुनील गावडे, रमेश पाटील, शितल दिलावर, सुवर्णा काकतीकर यांच्यासह इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article