महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिंडलगा-तुरमुरी रस्त्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने पाहणी

11:15 AM Aug 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/उचगाव

Advertisement

बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील हिंडलगा ते तुरमुरी रस्त्याच्या दुर्दशेची जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनी शनिवारी रात्री तातडीने पाहणी करून ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत, ते सर्व खड्डे बुजवण्याची सार्वजनिक बांधकाम खात्याला सूचना केली आहे. बेळगाव-वेंगुर्ले हा महत्त्वाचा महामार्ग असून यामार्गे तीन राज्ये जोडली जातात. मात्र या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते तसेच लोकप्रतिनिधींचे सातत्यानेच दुर्लक्ष झाल्याने प्रवासीवर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बेळगाव-बाची मार्गावरील सुळगा, बेळगुंदी फाटा, उचगाव, तुरमुरी आणि बाची तसेच कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीजवळील शिनोळी फाट्यावरील रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्याची दुर्दशा पाहून अनेक सामाजिक संस्था, ग्रामपंचायत अनेकवेळा दुरुस्तीसाठी पुढे सरसावत डागडुजी केली. मात्र ही दुरुस्ती तात्पुरती होत गेली. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागे. अनेकवेळा दुचाकी, चारचाकी वाहने नादुऊस्त होऊन रस्त्याकडेला उभे करण्याची वेळ येत होती. खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघातही झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. या संदर्भात ‘तऊण भारत’मधून आवाज उठविला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन शनिवारी रात्री रस्त्याची पाहणी केली आणि हा रस्ता तातडीने दुऊस्त करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याला केली.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article