आयएमईआरच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ
बेळगाव : केएलएस आयएमईआर महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धाला स्पिरिट फ्युल द फायर फिल्ड गेम्स या घोषवाक्मय समोर ठेवून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाल्या.आयएमईआरच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बीडीसीसी बँकेचे सभासद व माजी विद्यार्थी सतीश इराण्णा कडाडी, आयएमईआर डायरेक्टर डॉ. अरिफ शेख, क्रीडा निर्देशक जॉर्ज रोड्रिक्स, प्राध्यापक अतुल कदम, आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून व खेळाडूंची ओळख करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सतीश कडाडी म्हणाले एमबीए सारखा कठीण अभ्यास घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळाकडे लक्ष दिले पाहिजे. तरच आपले शरीर सुदृढ राहते, खेळाडूवृत्ती, शिस्तबद्धता व टीम स्पिरिट हे खेळापासून वाढते.यामुळे जिवनात खेळाला महत्व देणे जास्त गरजेच आहे. असे सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. अरिफ शेख यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या क्रीडा स्पर्धेत व्हॉलीबॉल, क्रिकेट, फुटबॉल, थ्रोबोल, टेबल टेनिस, शटल बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम, आधी खेळांचा समावेश आहे.