For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयएमईआर आंतरकॉलेज फुटबॉल स्पर्धा आजपासून

10:20 AM Sep 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
आयएमईआर आंतरकॉलेज फुटबॉल स्पर्धा आजपासून
Advertisement

चषकाचे अनावरण : 18 संघांचा सहभाग

Advertisement

बेळगाव : केएलएस, आयएमईआर, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आयोजित तिसऱ्या आयएमईआर चषक आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा 24 सप्टेंबरपासून जीआयटी मैदानावर प्रारंभ होणार असून या स्पर्धेच्या चषकाचे अनावरण सोमवारी करण्यात आले. टिळकवाडी येथील आयएमईआर महाविद्यालय आयोजित तिसऱ्या आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा 24 ते 26 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. सदर स्पर्धेत 18 संघांनी भाग घेतला असून त्यामध्ये जैन इंजिनिअरींग, भरतेश पॉलिटेक्निक, भरतेश होमिओपॅथिक, जेएनएमसी, एसजीबीआयटी, जैन बीसीए, जैन पॉलिटेक्निक, केएलई, गोगटे अ, जीआयटी, एआयटीएम, लिंगराज, आयएमईआर, आरपीडी, व्हीपीपी, मराठा मंडळ पालिटेक्निक, जीएसएस, गोगटे ब आदी संघांनी भाग घेतला आहे.

या स्पर्धेच्या चषकाचे अनावरण आयएमईआरच्या सभागृहात प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे संचालक डॉ. आरिफ शेख, क्रीडा प्राध्यापक जॉर्ज रॉड्रिग्ज, विजय रेडेकर आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या व वैयक्तिक खेळाडूंच्या चषकांचे अनावरण करण्यात आले. मंगळवारी स्पर्धेला प्रारंभ होणार असून उद्घाटनाचा सामना आयएमईआर व आरपीडी यांच्या सकाळी 10 वाजता होणार आहे. दुसरा सामना भरतेश पॉलिटेक्निक व भरतेश होमिओपॅथिक यांच्यात सकाळी 11 वाजता खेळविण्यात येणार आहे. तिसरा सामना एआयटीएम विरुद्ध लिंगराज यांच्यात 12 वाजता, चौथा सामना जेएनएमसी विरुद्ध एसजीबीआयटी यांच्यात दुपारी 1 वाजता, पाचवा सामना जीएसएस विरुद्ध गोगटे ब यांच्यात दुपारी 2 वाजता, सहावा सामना जैन बीएसीए विरुद्ध जैन पॉलिटेक्निक यांच्यात दुपारी 3 वाजता तर सातवा सामना व्हीपीपी विरुद्ध मराठा मंडळ पॉलिटेक्निक यांच्यात सायंकाळी 4 वाजता होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला आकर्षक चषक, रोख 15 हजार रुपये तर उपविजेत्या संघाला 10 हजार रुपये रोख व चषक देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट गोलरक्षक व उत्कृष्ट संघ अशी वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.