अनधिकृत पार्कींग,बंद कारंजा 'ऐतिहासिक स्टेशन चौकाची' दुरवस्था
सांगली / संजय गायकवाड :
तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यापासून ते मुंबई महापालिकेचे डॅशिंग अधिकारी गो. रा. खैरनार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, ज्येष्ठ नेते शरद पवार, गोपिनाथ मुंडे, अजित पवार, पतंगराव कदम, आर. आर. पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मदन पाटील, छगन भुजबळ अशा राज्य व देशपातळीवरील असंख्य नेत्यांनी ज्या चौकात सभा गाजविल्या, ज्यांच्या सभा ऐकण्यासाठी लोक पहाटेपर्यंत थांबून असत त्या सांगलीतील ऐतिहासिक स्टेशन चौकाची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. अनधिकृत पार्कीग, बंद पडलेला कारंजा, बेघर व भिकाऱ्यांनी केलेली घाणेघाण आणि अपुरा वीज पुरवठा यामुळे अंधाराचे साम्राज्य यामुळे स्टेशन चौकाची रवाच गेली आहे. या चौकाकडे महापालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. या चौकाला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मनपा व लोकप्रतिनिधी यांनी पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
सांगलीतील सर्वात जुना आणि ऐतिहासिक चौक म्हणून स्टेशन चौकाची ओळख आहे. या चौकालगत सध्याच्या वसंतदादांच्या स्मारकाजवळ पुर्वी सांगलीचे रेल्वे स्टेशन होते. येथून सांगली ते मिरज अशी रेल्वे ये जा करत होती. शहराच्या मध्यवर्ती भागात हे स्टेशन होते. काळाच्या ओघात स्टेशन बंद करून ते गावाच्या बाहेर नेण्यात आले. या चोकाला काहीजण स्टेशन चौक तर काहीजण जुना स्टेशन चौक म्हणून ओळखतात. काही महिन्यापुर्वीच येथे माजी आमदार नितीन शिंदे व स्वाती शिंदे यांच्या पुढाकाराने शहर डीवायएसपी ऑफीसमोरील चौकाचे शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौक असे नामकरण करण्यात आले. तरीही या चौकाची पूर्वीपासून स्टेशन चौक अशीच ओळख आहे.
स्टेशन चौकाला अनेक रस्ते येऊन मिळतात. सांगली मिरज रोडवरील महत्वाचा आणि प्रमुख म्हणून भौकानी ओळख आहे. माधवनगर, बुधगाव, कवलापूर, तासगाव या भागाकडून येणारा, सांगलीतील क्खारभागाकडून येणारा, रंकिल लाईनकडून येणारा, खणभागातील किमान चार रस्त्यांना जोडणारा चौक म्हणून स्टेशन चौकाची वेगळी ओळख आहे.या चौकात जशा मोठमोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या आजही होतात, जिल्हाधिकारी कार्यालय राजवाडा चौकात असताना सगळे मोर्ने बंद आंदोलने या चौकातून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असत. जिल्हाधिकारी कार्यालय मिरज रोडला गेल्यानंतर येथील मोर्गाची संख्या कमी झाली पण आंदोलने मात्र कायम आहेत. स्टेशन चौकाच्या एका बाजूला बीएसएनएलवे ऑफीस, समोर शहर डीवायएसपी ऑफीस, वसंतदादा आणि राजारामबापू पाटील यांचे स्मारक,बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प, मध्यभागी प्रसिध्द असा महात्मा गांधी व पंडित नेहरूंचा पुतळा, समोरच असणारे ४० वर्षाहूनचे जुने हॉटेल विहार, हॉटेलसमोर ४० वर्षापासून अखंडपणे सुरू असलेला गजानन पेपर स्टॉल, हा पेपर स्टॉल आणि स्टॉलवर बसणारे बाळासाहेब साळुंखे यांनी ओळखत नव्हता असा एकही माणूस नसावा. स्वर्गीय बाळासाहेब यांच्यानंतर सध्या त्यांचे चिरंजीव प्रशांत साळुंखे हे स्टॉल संभाळतात. समोरच एसएफसी मॉल व गणेश मार्केट अशी काहीशी रचना आहे. चौकानजिकच पुढे दोन पेट्रोल पंप यामुळे या रोडवर दिवसरात्र वाहनांची ये जा सुरू असते.
- स्टेशन चौकात प्रखर लाईट हवी
चौकात गेल्या अनेक वर्षापासून एक कारंजा आहे. तो कधी तर सुरू व अनेक वर्षे बंदच असतो. येथे मनपाने निश्चित केलेले अधिकृत असे कोणतेही पार्कंग नाही पण चौकाच्या बरोबर मध्ये अनेकजण चारचाकी गाडया पार्क करून निघून जातात. यातील बहुतांशी गाडया तीन तीन दिवस तशाच पडून असतात. चौकाला कोणी वाली नसल्याने बेघर तसेच भिकारी यांचा अड्डा झाला आहे. या लोकांकडून चौकात घाणेधाण करून टाकली आहे. तर एकाने येथे बेकायदेशीर शेंडान उभा केला आहे. येथे नुकतीच नवीन गटार तयार करण्यात आली पण ती वेळेवर साफ केली जात नाही. मध्यवर्ती चौक असूनही येथे पुरेशी लाईट नाही. त्यामुळे चौकात मोठा अंधार असतो. हॉटेल व्यवसायाच्या निमित्ताने मी १९८७ पासून स्टेशन चौकाशी संबंधित आहे. चोकाचे सुशोभिकरण व्हायला हवे.
-गणेश कन्हैय्यालाल कायस्थ, संचालक, हॉटेल विहार स्टेशन चौक सांगली
- चौकाला गतवैभव प्राप्त व्हावे
ऐतिहासिक सभा आणि अनेक आंदोलनांचा साक्षीदार असणाऱ्या स्टेशन चौकाची दुरावस्था झाली आहे. बंद असलेला कारंजा, पार्कीगची चांगली सोय नाही, समोरच असणाऱ्या स्टेजना भलत्याच कारणासाठी सुरू असलेला वापर यामुळे स्टेशन चोकानी रया केली आहे. चौकातील हे स्टेज काढून टाकण्याची आवश्यकता आहे. वसंतदादा आणि राजारामबापू पाटील यांच्या स्मारकामुळे चौकाचे रूप पालटले आहे. पण कांरजा पुन्हा सुरू करण्याबरोबरच येथे मोठे हॅलोजनचे दिवे तसेच बेघरांनी मारलेला ठिय्या हे सगळे चित्र बदलले पाहिजे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी स्टेशन चौकाच्या सुशोभिकरणासाठी तातडीने पावले उचलवीत.
-प्रशांत बाळासाहेब साळुंखे, गजानन पेपर स्टॉल, स्टेशन चौक सांगली