For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तराखंडच्या ग्लेशियरमध्ये अवैध बांधकाम

06:15 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
उत्तराखंडच्या ग्लेशियरमध्ये अवैध बांधकाम
Advertisement

‘बाबा’कडून मंदिराची अवैध निर्मिती : पवित्र कुंडाला केले स्वीमिंग पूल

Advertisement

वृत्तसंस्था/ बागेश्वर

उत्तराखंडच्या बागेश्वरमध्ये सुंदरढूंगा ग्लेशियरवर 5 हजार मीटरच्या उंचीवर एका ‘बाबा’ने शासकीय जमिनीवर अवैध पद्धतीने मंदिर उभारले आहे. तेथील पवित्र जलकुंडाचा आता स्वीमिंग पूलाप्रमाणे वापर केला जात आहे. हा प्रकार समोर आल्यावर सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.

Advertisement

कथित स्वयंभू बाबा योगी चैतन्य आकाश यांच्यावर याप्रकरणी आरोप झाले आहेत. स्वत: देवीने स्वप्नात येत मंदिर उभारण्याचा आदेश दिला होता असे त्याचे सांगणे आहे. हाच दावा करत त्याने मंदिर उभारणीकरता ग्रामस्थांची मदत मागितली होती असे स्थानिकांचे सांगणे आहे.

‘बाबा’ने पवित्र देवा कुंडाला बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी स्वीमिंग पूलाचे स्वरुप दिले असल्याचा आरोप स्थानिक लोकांकडुन केला जात आहे. दर 12 वर्षांनी नंदा राज यात्रेदरम्यान देवी-देवता देवी कुंडात येत असल्याची आमची मान्यता आहे. परंतु या ‘बाबा’ने लोकांची दिशाभूल करत आमच्या परंपरांच्या विरोधात हे मंदिर उभारले असल्याचे स्थानिक रहिवासी प्रकाश कुमार यांनी म्हटले आहे.

प्रशासनाकडून चौकशी सुरू

लोकांची नाराजी पाहता स्थानिक प्रशासनाने याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. वन विभाग, पोलीस आणि महसूल विभागाची एक टीम तपासासाठी लवकरच देवी कुंडचा दौरा करणार आहे. अतिक्रमण हटवत संबंधिताच्या विरोधात कारवाई केली जाईल असे कपकोटचे उपविभागीय न्यायदंडाधिकारी अनुराग आर्य यांनी सांगितले. संवेदनशील भागांमध्ये झालेले अतिक्रमण पाहता प्रशासनाचे अपयश देखील या प्रकरणामुळे ठळकपणे समोर आले आहे.

Advertisement
Tags :

.