इलमपार्थी भारताचा नवीन ग्रँडमास्टर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तऊण बुद्धिबळपटू इलमपार्थी ए. आर. हा गुऊवारी बोस्निया आणि हर्जेगोव्हिना येथे झालेल्या जीएम-4 बिजेलजिना 2025 बुद्धिबळ महोत्सवात अंतिम नॉर्म गाठल्यानंतर भारताचा नवीन ग्रँडमास्टर बनला आहे.
चेन्नईचा हा 16 वर्षीय खेळाडू भारताचा 90 वा ग्रँडमास्टर बनला आहे. देशाचा 90 वा ग्रँडमास्टर बनताना सर्व आवश्यकता पूर्ण केल्याबद्दल इलमपार्थी ए. आर.चे अभिनंदन. तुला आणखी अनेक गौरव मिळोत आणि देशाला अभिमान वाटावा असे यश लाभो, असे एआयसीएफचे अध्यक्ष नितीन नारंग यांनी ’एक्स’ वर लिहिले आहे. डिसेंबर, 2023 मध्ये इलमपार्थीने पहिला ग्रँडमास्टर नॉर्म मिळवला होता, त्यानंतर 2024 मध्ये दुसरा नॉर्म मिळविला. इलमपार्थीला ग्रँडमास्टर म्हणून घोषित करताना आनंद होत आहे. काही वेळा त्याला जेतेपदे हुकली आहेत, पण प्रत्येक वेळी त्याने जोरदार पुनरागमन केले आहे आणि अधिक मेहनत घेतली आहे. मला खरोखर विश्वास आहे की, त्याच्याकडे खूप क्षमता आहे आणि आम्ही मोठ्या कामगिरीसाठी एकत्र काम करू अशी आशा करतो, असे पाच वेळचा जागतिक विजेता विश्वनाथन आनंदने ’एक्स’ वर लिहिले आहे.