For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘आयएस’मध्ये जाणाऱ्या आयआयटीयनला अटक

06:29 AM Mar 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘आयएस’मध्ये जाणाऱ्या आयआयटीयनला अटक
Advertisement

आसाममध्ये कारवाई : संशयास्पद दस्तावेज जप्त

Advertisement

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

‘आयएसआयए’मध्ये सामील होण्याची इच्छा असलेल्या आयआयटी-गुवाहाटीच्या एका विद्यार्थ्याला नुकतेच आसाममधील हाजो येथे ताब्यात घेण्यात आले. बायोटेक्नॉलॉजीच्या चौथ्या वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या सदर विद्यार्थ्याकडून संशयास्पद साहित्यही जप्त करण्यात आले आहे. अलिकडेच तो आयआयटी-गुवाहाटी पॅम्पसमधून बेपत्ता झाला होता. गुवाहाटीपासून 30 किमी अंतरावर असलेल्या कामरूप जिल्ह्यातील हाजो येथे तो सापडला असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या वसतिगृहाच्या खोलीची तपासणी केली असता तेथे आयएसचा ध्वज आणि इस्लामिक हस्तलिखित जप्त केले.

Advertisement

आयआयटी गुवाहाटीच्या दिल्लीस्थित विद्यार्थ्याने लिंक्डइनवर एक खुले पत्र लिहून आपल्या निर्णयाचे कारण स्पष्ट केले होते. त्यानंतर त्याच्यासाठी लुकआउट अलर्ट जारी करण्यात आला होता. धुबरी जिल्ह्यात आयएसआयएस इंडियाचा प्रमुख हारिस फाऊकी याला अटक झाल्यानंतर लगेचच त्याच्यासंबंधीची माहितीही समोर आली होती.

Advertisement
Tags :

.