महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

क्रांती सर्कलच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष; जाहिरातींकडेच लक्ष..!

12:07 PM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कठडा कोसळत असतानाही सरकारला येईना जाग : क्रांति सर्कल नव्हे, बनले जाहिरात सर्कल,खासगी जाहिरातबाजी, पालिकेला नफा मात्र शून्य

Advertisement

पणजी : पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली गोवा असताना त्याला मुक्त करण्यासाठी राज्याच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी क्रांती झाली. ही क्रांती स्मरणात रहावी आणि त्याचा आदर्श युवा पिढीने घ्यावा यासाठी महत्त्वाचे चौक, ठिकाणे व सर्कल यांना महत्त्व आहे. परंतु असे असतनाही पणजी शहरात येताना दृष्टीस पडणाऱ्या क्रांतिकारी महत्त्व असलेल्या क्रांती सर्कलची दुरावस्था झालेली आहे. डागडुजी व सुशोभिकरणाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने या ठिकाणी केवळ जाहिरातींचे पोस्टर उभारण्यापुरता सर्कल राहिला आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पणजीतील क्रांती सर्कलची सद्य:स्थितीत दुरावस्था झालेली आहे. सर्कलला असलेले कठडे ठिकठिकाणी कोसळत आहे. सर्कलच्या ठिकाणी कोणतेही सुशोभिकरण कामाकडे लक्ष न दिल्याने सर्कलमध्ये मातीचे ढिगारे दृष्टीस पडत आहेत. याच ठिकाणी कुत्री, मांजर यांचा वावर वाढल्याने सर्कल विद्रुप होत असल्याचे दिसते. हल्लीच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांबाबतचे पोस्टर, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे बॅनर या सर्कलवर उभे केले होते. तरीही सरकारला या सर्कलच्या कठड्यांची डागडुजी करावी किंवा सुशोभिकरण करावे असे वाटले नाही. काही कंपन्यांची जाहिरातींचे पोस्टर या सर्कलच्या ठिकाणी बिनदिक्कतपणे उभे केले जात आहेत. या जाहिरातींचे पोस्टर उभे करताना पालिकेची रितसर परवानगीही न घेतल्याचे समजते. त्यामुळे पालिकेला जाहिरात फलक उभारणीतून मिळणारा नफाही शून्यच आहे. मग अशा प्रकारांना रोखणार तरी कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement

...तर शिवाजी महाराज पुतळ्याची मागणी पूर्ण करा

अखिल गोवा सॉलिडरिटी पीपल या संघटनेच्या शिष्टमंडळाने अॅङ डी. एल. पुसेकर यांच्या नेतृत्वाखाली 14 जून 2023 रोजी मुख्यमंत्री कार्यालयाकडे क्रांती सर्कलवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. जर ऐतिहासिक क्रांती सर्कलचा वापर केवळ जाहिरातीचे पोस्टर उभारण्यासाठीच होणार असेल आणि त्यातून पालिकेला उत्पन्नही मिळणार नसेल तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारावा, अशी मागणी राज्यातील शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे, त्याचा विचार सरकारने करावा.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article