महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोव्याला इफ्फी, पर्पल महोत्सवाचे वेध

06:17 AM Nov 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गोवा राज्य म्हटले म्हणजे जणू सुंदर सोबित (भांगराळे गोंय) राज्य. पायाभूत साधनसुविधा विकसित करण्याच्यादृष्टीने या राज्याने अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. पर्यटन क्षेत्रातही जगाच्या क्रमांकावर नावलौकिक कमावला आहे. कोरोनाची आता भीती नसल्याने अनेक देशी पर्यटकांनी सध्या राज्य फुलून गेले आहे. समुद्रकिनाऱ्याच्या फेसाळत्या लाटा अंगावर झेलण्यासाठी तसेच येथील आल्हाददायक निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटक गोव्यात येण्यासाठी आसुसलेला असतो.

Advertisement

गोवा म्हटले, म्हणजे ‘खा, प्या, मजा करा’ असा संदेश देणारे राज्य. या संस्कृतीला अनुसरून काही पर्यटक तर मद्याचे पेले रिचविण्यासाठी गोव्याला पसंती देतात. एकंदरित गोवा अनेकांना भावतो. गोवा समुद्रकिनाऱ्यांबरोबरच विलोभनीय मंदिर, चर्चेस, मशिद यासाठी विदेशी आणि देशी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. संस्कृती, उत्सव व एकूणच सौंदर्यात्मक गुणांसाठी गोवा वाखाणला जातो.

Advertisement

गोवा ही परशुराम भूमी मानली जाते. राज्य छोटे असले तरी उत्सव, महोत्सवांची मोठ्या प्रमाणात मांदियाळी असते. अनेक महोत्सवांचे गोवा हे जणू कायमस्वरुपी केंद्र ठरलेले आहे. गोव्यातील समुद्रकिनारे, चर्चेस तसेच विविध मंदिरे पाहण्यासाठी येणारे देशी-विदेशी पर्यटक या उत्सव, महोत्सवांचाही लाभ घेऊन सुखावून जातात. अशा या गोवा राज्यात बाराही महिने उत्सवांची पर्वणी असते.

सध्या गोव्यात 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तयारी सुरू आहे. 20 नोव्हेंबरपासून चंदेरी नगरी राजधानी पणजीत उत्सव होणार आहे. या निमित्ताने अनेक चित्रपट अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माते येथे येतात. निसर्गप्रधान गोवा अनेकांना भावतो. त्यामुळेच गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कायमस्वरुपी केंद्र बनले आहे. यातूनच गोवा राज्याची महती दिसून येते. आता कला अकादमी जनतेसाठी खुली होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी वापरली जाणार असल्याने चित्रपट महोत्सवाला अधिकच शोभा येणार आहे. अनेक परिषदांचे आयोजन राज्यात होत असते. या परिषदाही गोव्यासाठी कायमस्वरुपी बनलेल्या आहेत. एकंदरित या महोत्सवांमुळे गोव्याचे महत्त्व सातासमुद्रापार पोहोचलेले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

पर्पल फेस्ट 8 जानेवारीपासून

दिव्यांग बांधवांसाठी राज्य आयुक्त कार्यालय, सामाजिक कल्याण संचालनालय, गोवा सरकार आणि दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणारा ‘पर्पल फेस्ट’ हा एक वार्षिक कार्यक्रम असून, पणजी येथे दि. 8 ते दि. 13 जानेवारी 2024 या कालावधीत याचे आयोजन करण्यात आले आहे.

गतवर्षी देशात प्रथमच गोव्यात आयोजन केलेल्या दिव्यांग बांधवांच्या ‘पर्पल फेस्ट’चे यश लक्षात आल्यानंतर यंदा जागतिक पातळीवर होणाऱ्या या पर्पल उत्सवाची चार श्रेणींमध्ये नोंदणी सुरू झाली आहे. यंदाही हा उत्सव यशस्वी आणि ‘न भूतो न भविष्यती’ असा व्हावा, यासाठी राज्य दिव्यांग आयुक्तालय व समाज कल्याण खात्यातर्फे जय्यत तयारीला प्रारंभ झाला आहे. यंदा या उत्सवासाठी योग्य नियोजन केल्याची माहिती राज्य दिव्यांग आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी दिली.

पर्पल फेस्टने कलागुणांना प्रेरणा देण्यासाठी आणि विस्तारित करण्यासाठी, समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि सर्वसमावेशकतेची आमची वचनबद्धता पुन्हा एकदा बळकट करण्यासाठी त्याचे दरवाजे उघडले आहेत. यावर्षी आपण एक पाऊल पुढे जात असताना हा फेस्ट आंतरराष्ट्रीय बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले, यालाही यश निश्चितच मिळणार आहे. आरोग्य, प्रवेशयोग्यता, शिक्षण आणि लिंग यासारख्या विषयांची सत्रे यंदाच्या पर्पल फेस्टमध्ये आहेत. या महोत्सवात दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या साहाय्यक साहाय्यांचे आणि उत्पादनांचे प्रदर्शन केले जाईल, त्यांना सक्षम बनविले जाईल आणि यातून त्यांची सर्जनशीलता ठळक होईल. एक जागतिक व्यासपीठ म्हणून सेवा देणारा हा ‘पर्पल फेस्ट’ महोत्सव व्यक्ती, संस्था आणि तज्ञांमध्ये सहकार्य आणि सक्षमीकरणाचे दर्शन घडविणार आहे. या महोत्सवाच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमध्ये ‘पर्पल थिंक टँक’ अंतर्गत विविध अधिवेशने आणि गंभीर चर्चा, अडॅप्टिव्ह स्पोर्ट्स चॅम्पियनशिप यांचा समावेश आहे, ज्यामुळे दिव्यांग खेळाडू त्यांच्या क्षमतांचे प्रदर्शन करू शकतात.

राज्यात मागील वर्षी पहिल्यांदाच आयोजित केलेल्या पर्पल फेस्टला देशभरातून मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन हा महोत्सव आता ‘आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा 2024’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा 2024च्या औपचारिक कार्यक्रमाचे उद्घाटन करताना नुकतीच केली आहे.

समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी मनोगतात सांगितले की, चैतन्यमय, वैविध्यपूर्ण आणि आदरशील अशा गोव्याच्या चैतन्याला हा महोत्सव मूर्त रुप देतो. पर्पल फेस्टचे यजमानपद भूषविणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असून याद्वारे सर्वसमावेशकतेच्या विचाराचा विस्तार करण्याची संधी लाभणार आहे. पर्पल फेस्ट 2024 हा केवळ उत्सव नाही, तो एकता, समानता आणि समजूतदारपणा आणण्यासाठीचे एक दमदार आवाहन आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल गोवा सरकारचे कौतुक केले आहे. गोवा हे प्रगतीशील आणि कल्याणकारी राज्य होण्यासाठी सरकारने तसेच नागरिकांनी काळाच्या अनुषंगाने पुढे जाणे आणि दिव्यांगांकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहणे आवश्यक आहे. तरच हा महोत्सव आयोजित करण्याचे फलित लाभणार आहे.

आगामी विविध महोत्सवांमुळे तसेच आगामी सनबर्न तसेच अन्य महोत्सवांमुळे वाहतूक कोंडीत भर पडणार आहे. यामुळे अपघातांचीही शक्यता आहे. पर्वरी ते पणजी तर वाहतूक कोंडी ही नेहमीच पाचवीला पूजलेली आहे. रस्त्यानजीक असणारे वाहनांचे शोरूम, मॉल तसेच पणजी राजधानीत असलेला कॅसिनोचा बाजार यामुळे होणारी वाहतूक कोंडी ही नित्याचीच बनली आहे. यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. नियोजित स्थळी योग्यवेळी पोहोचणेही यामुळे अवघड बनते. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना आखणे, हे गोवा सरकारचे कर्तव्य ठरते.

पर्यटन केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्याची राजधानी पणजी शहर सध्या डबघाईला आले आहे. ग्रामीण भागापेक्षाही पणजी शहरातील रस्त्यांची पार दुर्दशा झालेली आहे. स्मार्ट सिटी म्हणून ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या राजधानीची अवस्था केविलवाणी ठरणे दुर्देवी आहे. यातच होणाऱ्या विविध महोत्सवांमुळे पणजीत होणारी गर्दी, वाहतूक कोंडी यामुळे सर्वसामान्यांचा श्वास जणू गुदमरतो आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यातून योग्य मार्ग काढून हे सर्व महोत्सव सुखदायक ठरावेत, याकडे गोवा सरकारने कटाक्ष ठेवणे आवश्यक आहे.

राजेश परब

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article