‘अ युजफूल घोस्ट’ ने होणार इफ्फीचा समारोप
पणजी : ‘अ युजफूल घोस्ट’ या चित्रपटाने 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप होणार आहे. थाई चित्रपट निर्माते रत्चापूम बूनबंचचोके यांनी या विनोदी भयपटाची निर्मिती केली आहे. येत्या 20 नोव्हेंबरपासून गोव्यात 56 व्या इफ्फीचे आयोजन होणार असून तो 28 पर्यंत चालणार आहे. ‘अ युजफूल घोस्ट’ हा विनोदी भयपट नॅट या महिलेच्या जीवनावर आधारित आहे. धूळ प्रदूषणामुळे त्या महिलेचा मृत्यू होतो परंतु आपल्या पतीजवळ राहण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनरमध्ये भूत बनून परत येते. तिला सूडबुद्धींना तोंड द्यावे लागते आणि सामाजिक नियमांना आव्हान दिले जाते. हास्यास्पद विनोद, विचित्र थीम आणि थायलंडच्या पर्यावरणीय आणि सामाजिक वास्तवांवर थेट भाष्य यांचे मिश्रण असलेला ‘अ युजफूल घोस्ट’ हा चित्रपट 2025 च्या कान्स चित्रपट महोत्सवात क्रिटिक्स वीक ग्रँड पुरस्काराच विजेता ठरला होता. या चित्रपटाची 90 व्या अकादमी पुरस्कारांसाठी थायलंडची अधिकृत ऑस्कर प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे.