For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इफ्फीत यंदा ‘एआय’ आधारित चित्रपट महोत्सव

12:54 PM Nov 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
इफ्फीत यंदा ‘एआय’ आधारित चित्रपट महोत्सव
Advertisement

भारतीय चित्रपट इतिहासात प्रथमच अनोखा प्रयोग

Advertisement

पणजी : गोव्यात आयोजित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) यंदा देशाच्या चित्रपट इतिहासात प्रथमच आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) आधारित चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याद्वारे सर्जनशीलता आणि तंत्रज्ञान यांच्या अभूतपूर्व मिश्रणाचा अनुभव घेता येणार आहे. दि. 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधित होणाऱ्या इफ्फीमध्ये एलटीआय माइंडट्री आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता चित्रपट निर्मिती आणि कथाकथनाच्या जगात कसे परिवर्तन घडवू शकते’ हे शोधणे, तसेच ‘चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांना एआय-चालित साधने आणि सर्जनशीलता यांच्या माध्यमातून प्रयोग करण्यासाठी एकत्र आणणे’ हा या एआय चित्रपट महोत्सवाचा उद्देश आहे.

प्रसिद्ध चित्रपट निर्माते तथा महोत्सवाचे संचालक आणि एआय चित्रपट महोत्सव ज्युरी अध्यक्ष शेखर कपूर यांनी या कार्यक्रमासंबंधी बोलताना, ‘सिनेमाच्या उक्रांतीतील हा एक रोमांचक नवीन अध्याय ठरणार’ असल्याचे वर्णन केले. एआयमुळे आपल्याला एक नवीन दृष्टी मिळाली असून त्याद्वारे आपल्यातील स्वप्न पाहण्याची, डिझाइन करण्याची आणि व्यक्त होण्याची क्षमता वाढविण्यात मदत होणार आहे. या उक्रांतीसाठी ‘इफ्फी एआय चित्रपट महोत्सव’ हे एक क्रीडामैदान ठरणार आहे, असे कपूर यांनी पुढे सांगितले.

Advertisement

‘हॅकेथॉन’ चेही आयोजन

तंत्रज्ञानाच्या युगात मानवी सर्जनशीलता आणि एआय यांच्या संगमावर कथाकथनाचे भविष्य ठरणार आहे. अशावेळी एआय चित्रपट महोत्सवात फिक्शन, डॉक्युमेंटरी, अॅनिमेशन आणि प्रायोगिक सिनेमा यासारख्या शैलीद्वारे एआय-निर्मित चित्रपटांचे प्रदर्शन असेल. त्यासाठी नाविन्यपूर्ण एआय-आधारित फिल्म टूल्स आणि अॅप्लिकेशन्स तयार करण्यासाठी 48 तासांचा ‘हॅकेथॉन’ देखील आयोजित करण्यात येणार आहे. त्याशिवाय अन्य विषयांवर विविध कार्यशाळा, मास्टरक्लास असतील. तसेच विविध सत्रांमधून ‘डिजिटल युगात लेखकत्व, मौलिकता आणि सर्जनशील अखंडता’ यासारख्या विषयांवर चर्चा होणार आहे. थोडक्यात, आधुनिक चित्रपटसृष्टीत कला, नावीन्य आणि कल्पनाशक्ती यांचा समन्वय साजरा करणारा असा हा महोत्सव ठरणार आहे.

Advertisement
Tags :

.