आजपासून ‘इफ्फी’पर्व
11:29 AM Nov 20, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
अशाप्रकारे पुढील नऊ दिवसांसाठी रंगणाऱ्या या सोहळ्यात समकालीन तेजस्वीपणा, सांस्कृतिक समृद्धता तसेच भारतीय आणि जागतिक चित्रपटांची व्याख्या करणाऱ्या कथाकथनाच्या किमान 270 चित्रपटांचा आस्वाद घेण्याची संधी प्रेक्षकांना लाभणार आहे. त्याचबरोबर या महोत्सवाच्या माध्यमातून तऊणाईतील सर्जनशील मनांना एआय-चालित नवोन्मेषासाठी ‘इफ्फीस्टा’ द्वारे नवे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. इफ्फीमध्ये यंदा क्रिएटिव्ह माईंड्स ऑफ टुमारो (सीएमओटी), वेव्हज फिल्म बाजार (19 वी आवृत्ती), द नॉलेज सिरीज, सिनेमाएआय हॅकेथॉन, इफ्फीएस्टा - कल्चरल शोकेस आणि मास्टरक्लासेस, पॅनेल व इंटरॅक्टिव्ह प्रोग्राम्स् यांचा समावेश आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्पर्धा, दिग्दर्शकाचे सर्वोत्कृष्ट पदार्पण फीचर फिल्म, आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक आणि मॅकाब्रे ड्रीम्स, डॉक्यु-मोंटेज, एक्सपेरिमेंटल फिल्म्स, युनिसेफ आणि रिस्टोर्ड क्लासिक्स असे खास विभाग समाविष्ट असलेल्या 15 स्पर्धात्मक आणि क्युरेटेड विभागांचाही त्यात समावेश असणार आहे. अशाप्रकारे पुढील नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा दि. 28 नोव्हेंबर रोजी ‘अ युजफूल घोस्ट’ या चित्रपटाने समारोप होणार आहे. बांबोळी येथे श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये समारोप सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून त्याचवेळी पुरस्कारांचीही घोषणा करण्यात येणार आहे.
Advertisement
‘भारत एक सूर’ भव्य परेडने उद्घाटन : ‘द ब्लू ट्रेल’ चित्रपटाने उघडणार पडदा,देशविदेशांतील सिने दिग्गजांची उपस्थिती,जगभरातील 270 हून अधिक चित्रपट
Advertisement
पणजी : राज्यासाठी एक वार्षिक संस्मरणीय उत्सव ठरलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) आज दिमाखदार सोहळ्याने शुभारंभ होत आहे. दुपारी 3.30 वाजता होणाऱ्या या सोहळ्यासाठी देशविदेशातील चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे. तत्पूर्वी गोव्यासह आंध्र प्रदेश, हरियाणा, आदी विविध राज्यांमधील कलाकारांचा सहभाग असलेल्या आणि विविधतेतून एकतेचे दर्शन घडविणाऱ्या ‘भारत एक सूर’, या ऐतिहासिक भव्य परेडचे आयोजन होणार आहे. जुन्या सचिवालयाकडून प्रारंभ होणाऱ्या या परेडची कला अकादमी परिसरात सांगता होणार असून त्यानंतर ‘द ब्लू ट्रेल’ या चित्रपटाने इफ्फीचा पडदा उघडणार आहे.
Advertisement
Advertisement
Next Article