‘इफ्को’ देशात 201 नॅनो मॉडेल गावांची करणार निर्मिती
उपक्रमासाठी जवळपास 80 कोटी रुपयांचा खर्च होण्याचा अंदाज
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
खत निर्मिती क्षेत्रातील दिग्गज इफ्को कंपनी आगामी खरीप सत्रात ‘201 नॅनो आदर्श गावे’ विकसित करणार असल्याची माहिती आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी इफ्को कंपनीने येत्या काळात जवळपास सुमारे 80 कोटी रुपये इतका खर्च करण्याची योजना आखली आहे. हा बहुधा अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न राहणार असल्याचेही म्हटले जात आहे. नॅनो युरिया आणि डीएपी सारख्या नॅनो उत्पादनांचा अवलंब करण्यासाठी इफ्को मॉडेलवर आधारीत गावांच्या या क्लस्टरमधील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यास मदत होणार असल्याचेही सांगितले जात आहे.
21 राज्यांमध्ये होणार उपक्रम
या उपक्रमांतर्गत 21 राज्यांमध्ये 201 नॅनो मॉडेल व्हिलेज क्लस्टर्सचा शोध घेतला जाणार आहे. हा कार्यक्रम सुमारे 8,00,000 लाख हेक्टर क्षेत्रात पसरला जाणार असल्याचा अंदाज आहे. अशा 201 नॅनो गावांसाठी समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे समन्वयक या गावांमध्ये सर्वेक्षण करणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.