वेगवान इंटरनेट हवे असल्यास मंगळावर जा!
मंगळ ग्रहावर पृथ्वीपेक्षा अधिक हायस्पीड इंटरनेट सेवा सुरू होत आहे. या वृत्तामुळे अनेक लोक नाराज देखील आहेत कारण इंग्लंडसारख्या देशात देखील मोठ्या हिस्स्यात इंटरनेट सेवा अद्याप खराब आहे. अशास्थितीत मंगळ ग्रहावर हायस्पीड इंटरनेट सेवा सुरू करण्यावर लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मंगळ ग्रहावर हायस्पीड इंटरनेट स्थापित करण्याचा प्रयोग सुरु असून लवकरच ही प्रणाली काम करू लागणार आहे. नासाच्या नव्या क्रांतिकारक तंत्रज्ञानामुळे मंगळ ग्रहावर युकेपूर्वी हायस्पीड इंटरनेटची सुविधा उपलब्ध होऊ शकते. नासाने याची पुष्टी देखील केली आहे. अखेर मंगळावर हायस्पीड इंटरनेटची गरज कोणाला आहे आणि तेथे अशी प्रणाली का स्थापन केली जात आहे असे प्रश्न उपस्थित होतात.
डीप स्पेस ऑप्टिकल कम्युनिकेशन्स
प्रत्यक्षात ही नासाच्या डीप स्पेस इंटरनेट नेटवर्क योजना आहे. याचा सर्वात पहिला लाभ मंगळ ग्रहाला मिळणार आहे. डीप स्पेस ऑप्टिकल कम्युनिकेशन्स नावाच्या नव्या तंत्रज्ञानाचे परीक्षण सध्या नासाच्या साइकी अंतराळ यानावर केले जात आहे आणि आतापर्यंतचे निष्कर्ष आशादायक राहिले आहेत.
हायडेफिनेशन डाटा पाठविण्यास मदत
ही प्रणाली दूर अंतराळातून डाटा पाठविण्यासाठी पारंपरिक रेडिओ ट्रान्समिशनऐवजी शक्तिशाली लेझर्सचा वापर करते, जी वर्तमान पद्धतींच्या तुलनेत 100 पट अधिक वेग प्रदान करते. डीएसओसीमुळे लाखो किलोमीटर अंतरावरुन हाय डेफिनेशन व्हिडिओ आणि जटिल डाटा पाठविला जाऊ शकतो. म्हणजेच या तंत्रज्ञानाद्वारे अंतराळ किंवा मंगळ ग्रहावर होणाऱ्या संशोधनाचा डाटा, व्हिडिओ, ऑडिओ आणि इमेजेज सहजपणे काही सेकंदात पृथ्वीवर प्राप्त होणार आहेत.
267 मेगाबिट प्रतिसेकंदाचा वेग
हे तंत्रज्ञान यापूर्वीच 460 दशलक्ष किलोमीटरवरून डाटा पाठविण्यास सक्षम ठरले आहे. हे अंतर पृथ्वी आणि मंगळादरम्यानच्या अंतरापेक्षाही अधिक आहे. या प्रणालीचा वेग इतका अधिक आहे की पृथ्वीवर ब्रॉडबँड सेवा देणाऱ्या बहुतांश एजेन्सी देखील मागे पडतील. अत्यंत नजीकच्या अंतरावर म्हणजेच पृथ्वी आणि मंगळादरम्यान 53 दशलक्ष किलोमीटरचे अंतर आहे. या डीएसओसी सिस्टीमला 267 मेगाबिट प्रतिसेकंदाचा वेग प्राप्त आहे. उच्च वेग असलेल्या इंटरनेटच्या क्षेत्रत ही एक मोठी कामगिरी आहे.
नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत डीएसओसी प्रोजेक्टचे टेक्नोलॉजिस्ट अभिजीत अबी बिस्वास यांनी आमची कामगिरी प्रत्यक्षात खूपच चांगली राहिली असल्याचे सांगितले. आम्ही आमच्या सर्व लेव्हल वन आवश्यकतांना पूर्ण करण्यास सक्षम राहिलो असून प्रत्यक्षात हे अपेक्षेपेक्षा अधिक चांगले राहिले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
रिसर्च डाटाला कम्युनिकेट करण्याची सुविधा
हे तंत्रज्ञान सध्या स्वत:च्या प्रायोगिक टप्प्यात आहे, परंतु याचे महत्त्व अत्यंत अधिक आहे. मंगळ ग्रहावर पाठविण्यात येणारे रोव्हर्स, ऑर्बिटर्स आणि भविष्यातील मानवयुक्त मोहिमांसोबत कम्युनिकेशनच्या पद्धतीत ही एक अत्यंत मोठी झेप ठरणार आहे.
अनेक देश याप्रकरणी पिछाडीवर
पृथ्वीवर हे क्रांतिकारक संचार यश अशा लोकांसाठी कटू असू शकते, जे अद्याप मंदगतीच्या इंटरनेट स्पीडला सामोरे जात आहेत. विशेषकरून ब्रिटनच्या गामीण भागांमध्ये अद्याप लोक वेगवान ब्रॉडबँडची प्रतीक्षा करत आहेत. येथील अनेक क्षेत्रांमध्ये कनेक्टिव्हिटीची समस्या आहे. या भागांमध्ये आता कुठे 4जी पोहोचू शकले आहे. अशा स्थिती लोक मंगळ ग्रहावर हायस्पीड इंटरनेट तंत्रज्ञान विकसित करण्याबद्दल नाराजी देखील व्यक्त करत आहेत.