कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ज्वालामुखीत गोळा फेकला तर ?

06:32 AM Feb 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ज्वालामुखी हा नेहमीच मानवाच्या अत्यंत स्वारस्याचा विषय राहिला आहे. पृथ्वीवर अनेक स्थानी ज्वालामुखी असून ते सुप्त आणि जागृत अशा दोन प्रकारचे असतात. त्यांच्यापैकी जागृत ज्वालामुखीसंबंधी आपल्याला विशेष कुतुहल किंवा उत्सुकता असते. संशोधकही त्यांचा कित्येक दशकांपासून शोध घेत आहेत.

Advertisement

जागृत ज्वालामुखीतून तप्त लाव्हारस, राख आणि धातूंचे कण बाहेर पडत असतात. अशा ज्वालामुखीत किंवा सुप्त ज्वालामुखीतही एकादा घट्ट गोळा टाकला तर काय होईल, हा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. ज्वालामुखीच्या गर्भातील अतितीव्र तापमानात वितळणार नाही, असा हा गोळा असला पाहिजे. तो ज्वालामुखीत टाकल्यास तो कोठे जाईल, किंवा त्याचे काय होईल, यावर बरीच मतमतांतर आहेत. हा गोळा जर वितळला नाही, तर तो पृथ्वीच्या मध्यापर्यंत पोहचेल काय, हा मुख्य प्रश्न आहे. याचे उत्तर काही संशोधकांनी दिले आहे. त्यांच्या मते टंगस्टन या धातूचा गोळा आत टाकला तरी तो पृथ्वीच्या मध्यापर्यंत जाण्याची शक्यता कमी आहे. कारण पृथ्वीचा मध्य तिच्या पृष्ठभागापासून किमान पाच हजार किलोमीटर अंतरावर आहे. पृथ्वीच्या मध्यमागी लाव्हारस असतो आणि तो पृथ्वीची विविध वलये पार करुन पृष्ठभागावर येत असतो. मध्यात तापमान 3,700 डिग्री सेल्शियस इतके प्रचंड असते. टंगस्टनचा वितलन बिंदू 3,200 डिग्री सेल्शियस इतका असतो. त्यामुळे तो मध्यात जाण्यापूर्वीच वितळेल. परिणामी कोणतीही पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वस्तू पृथ्वीच्या मध्यापर्यंत घन स्वरुपात जाऊ शकणार नाही, असे उत्तर देऊन संशोधकानी हा प्रश्न सोडविला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article