कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गावात स्थायिक झाल्यास मिळणार 93 लाख

06:37 AM Apr 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राहण्यासाठी मिळणार घर

Advertisement

जगात असे अनेक देश आहेत, जे अत्यंत सुंदर आहेत, परंतु तेथील लोकसंख्या कमी होत चालली आहे. अनेक देशांमध्ये तर लोकसंख्या घटल्याने पूर्ण गावं रिकामी होत आहेत. जपान आणि इटलीतील अनेक गावांमध्ये लोक राहूच इच्छित नाहीत. सर्व लोक गावं सोडून शहरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. अशा स्थितीत तेथे राहणारा आता कुणीच नाही. याचमुळे या गावांमध्ये राहण्यासाठी लोकांना पैसे देऊन बोलाविले जात आहे.

Advertisement

इटलीसह अमेरिकेतील काही गावांमध्ये देखील लोकांना स्थायिक होण्यासाठी सरकारच बोलावत आहे. आता नवी ऑफर इटलीतील सुंदर पर्वतीय भागातून आली आहे. येथे स्थायिक झाल्यास राहण्यासाठी घर आणि 93 लाख रुपये देखील दिले जाणार आहेत. येथे राहण्यासाठी काही अटींचे पालन करावे लागणार आहे.

इटलीचा उत्तर प्रांत त्रेनतिनोमध्ये ही ऑफर दिली जात आहे. याला ऑटोनॉमस प्रॉविन्स ऑफ टेंट्रो या नावाने देखील ओळखले जाते. येथे निर्जन पडलेल्या घरांमध्ये राहण्यासाठी कुणी येत असेल तर त्याला एकूण 1 लाख युरो म्हणजेच 92,69,800 रुपये दिले जाणार आहेत. यात अनुदान म्हणून 80 हजार युरो म्हणजेच 74 लाख 20 हजार 880 रुपये घराच्या दुरुस्तीसाठी मिळतील तर उर्वरित 20 हजार युरो म्हणजेच 18 लाख 55 हजार 220 रुपये घर खरेदीसाठी देण्यात येणार आहेत.

अटीचे पालन करावे लागणार

ही ऑफर इटलीच्या नागरिक आणि विदेशात स्थायिक झालेल्या लोकांसाठीच आहे, परंतु याचबरोबर एक अट देखील आहे. जो हा करार करेल त्याला या मालमत्तेत कमीत कमी 10 वर्षांपर्यंत रहावे लागणार आहे. जर तो त्यापूर्वी येथून अन्यत्र गेल्यास त्याला अनुदानाची सर्व रक्कम परत करावी लागणार आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत प्रांतातील 33 गावांना सामील करण्यात आले असून येथे अनेक घरं रिकामी पडली असून तेथे राहणारा कुणीच नाही.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article