कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

घोटाळा नसेल तर काँग्रेसने ईडीच्या नोटिसीला उत्तर द्यावे

11:32 AM Apr 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा सल्ला

Advertisement

पणजी : वर्ष 2012 मध्ये सुरू झालेल्या नॅशनल हेराल्ड प्रकरणात कोणताही घोटाळा नसेल व स्वत:चा काहीच दोष नसेल तर काँग्रेस नेत्यांनी त्यासंबंधी ईडेने पाठविलेल्या नोटिसीला उत्तर द्यावे. उगाच भाजपच्या विरोधात कांगावा करून लोकांची सहानुभूती मिळविण्याचे प्रयत्न करू नयेत, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केली आहे. गुऊवारी पणजीत भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर व सर्वानंद भगत यांचीही उपस्थिती होती. एखाद्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते, तेव्हा तो आपल्यावर अन्याय होत असल्याचा कांगावा करतो. नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या निर्णयाविरोधात निदर्शने, आंदोलने करून काँग्रेस आज तेच करत आहे. देशभरातील सर्व मालमत्ता आपलीच आहे अशा मानसिकतेत वावरताना जनतेची दिशाभूल करत आहे, अशी टीका दामू नाईक यांनी केली.

Advertisement

काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह अन्य काँग्रेस नेत्यांनी नॅशनल हेराल्डची सुमारे 2500 कोटी ऊपयांची मालमत्ता स्वत:च्या नावावर केली आहे. खरे तर कोणताही राजकीय पक्ष हा पैशांची देवाण-घेवाण करणारी कंपनी नसतो. मात्र काँग्रेसने नॅशनल हेराल्डची मालमत्ता बळकावण्याच्या उद्देशाने आधी त्यांना 90 कोटी ऊपयांचे कर्ज दिले व नंतर स्वत: स्थापन केलेल्या ‘यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या माध्यमातून नॅशनल हेराल्डवरील 90 कोटी ऊपयांच्या कर्जाच्या बदल्यात त्यांची 2500 कोटी ऊपयांची मालमत्ता ताब्यात घेतली, असे दामू नाईक यांनी सांगितले. आता जेव्हा त्यांना ईडीच्या नोटिसा येऊ लागल्या तेव्हा हे सर्व भाजपकडून राजकीय हेतूने होत असल्याचे आरोप करत ते मोर्चे काढत आहेत. या प्रकरणाला ते राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु अशाप्रकारे त्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी जनता फसणारी नाही, कारण भ्रष्टाचार कोणी केले हे जनतेला माहीत आहे, असे नाईक म्हणाले.

काँग्रेस संपला तरी पापे अद्याप अस्तित्वात

अन्य एका प्रश्नावर बोलताना त्यांनी, काँग्रेस पक्ष संपला आहे हे सत्य असले तरी त्यांची असंख्य पापे अद्याप अस्तित्वात आहेत, ती जनतेसमोर आणि खास करून विद्यमान पिढीसमोर आली पाहिजेत. तेच काम आम्ही आता करणार असून  काँग्रेसचे सर्व कारनामे व त्यामागील खरी माहिती घराघरात पोहोचवणार आहोत, असे दामू नाईक यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article