महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वैध कागदपत्रे नसल्यास रोकड होणार जप्त

12:07 PM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय : जिल्हाधिकारी आश्विन चंद्रू यांची माहिती

Advertisement

मडगाव : गोव्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पन्नास हजारांपेक्षा जास्त रोकड जवळ बाळगल्यास संबंधित व्यक्तीला वैध कागदपत्रे दाखवावी लागतील,  अशी माहिती दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू यांनी दिली. निवडणुकीतील अवैध बाबींवर पाळत ठेवण्यासाठी दक्षिण गोव्यात 24 भरारी पथके कार्यरत असतील, अशीही माहिती त्यांनी दिली. वैध कागदपत्रांशिवाय 50 हजारांपेक्षा जास्त रोकड जवळ बाळगल्यास जप्त केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. संशयास्पद आर्थिक व्यवहारांबाबत माहिती देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. बँकांनी आर्थिक व्यवहार करताना सतर्क रहावे, असेही त्यांनी सूचित केले आहे. 24 भरारी पथकांबरोबरच दक्षिण गोव्यात 11 पाळत ठेवणारी पथके तैनात केली जातील. ही पथके रेल्वे स्टेशन, विमानतळ तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी पाळत ठेवणार आहेत. सध्या निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात असून हे प्रशिक्षण लवकरच पूर्ण होणार आहे. दक्षिण गोव्यात 20 नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांनाही प्रशिक्षण दिले जात आहे. हे अधिकारी नंतर इतरांना प्रशिक्षण देणार आहेत. अंमलबजावणी विभागाकडे देखील बैठका होत असून निवडणुकीत गैरप्रकार होऊ नये याची काळजी घेतली जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. राजकीय पक्षांकडे देखील सातत्याने बैठका घेतल्या जातात व त्यांना मार्गदर्शक तत्त्वांची माहिती दिली जाते. उमेदवारी अर्ज भरताना कशा प्रकारे भरावे यासाठीचे मार्गदर्शन केले जात आहे. निवडणुकीच्या काळात कुणाला तक्रारी करायच्या असल्यास त्यांनी अॅप डाऊनलोड करावे किंवा दूरध्वनी क्रमांक 1950 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दक्षिणेत बेळगाव आणि कारवार सीमेवर तपासणी नाक्मयांवर 24 तास पोलिस तैनात असतील. पोलिसांकडून नाकाबंदीच्या काळात संशयास्पद वाहनांची तपासणी केली जाईल अशी माहिती दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली. संवेदनशील मतदान केंद्रांची माहिती गोळा केली जात असून पुढील दोन-तीन दिवसात माहिती उपलब्ध झाल्यानंतर संवेदनशील मतदान केंद्रे घोषित केली जाणार आहेत. या संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

Advertisement

नव्या मतदारांची नोंदणी करता येईल

मतदारांची यादी तयार झाली असली तरी अद्याप नव्या मतदारांना आपली नोंदणी करता येईल. त्यांना फॉर्म 6 भरून अर्ज करता येईल. त्यांना मतदार कार्ड दिले जाईल, तसेच त्यांची नोंदणी वेगळी ठेवली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी चंद्रू यांनी दिली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article