For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तैवानचे समर्थन केल्यास रक्ताचे पाट वाहणार

07:00 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
तैवानचे समर्थन केल्यास रक्ताचे पाट वाहणार
Advertisement

चीनची धमकी : तैवानच्या चहुबाजूला युद्धनौका तैनात

Advertisement

वृत्तसंस्था /बीजिंग

तैवानच्या स्वातंत्र्याचे समर्थन करणाऱ्यांना धडा शिकण्यात येईल आणि रक्ताचे पाट वाहतील अशी धमकी चीनने गुरुवारी दिली आहे. स्वयंशासित बेट तैवानजीक आमच्या सैन्याभ्यासाचा उद्देश ‘गंभीर इशारा’ देणे असल्याचे चीनने म्हटले आहे. तैवानच्या नौदलाने चिनी युद्धाभ्यासाचे छायाचित्र शेअर केले आहे. तैवानमध्ये अलिकडेच लाई लिंग यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. शपथग्रहणानंतर लाई चिंग यांनी चीनला इशारा दिला होता. चीनने आता तैवानला धमकाविणे बंद करावे. तैवान सामुद्रधुनीत शांतता प्रस्थापित करण्याची तसेच तैवानमध्ये लोकशाहीचे रक्षण करण्याची शपथ घेत असल्याचे लाई चिंग यांनी म्हटले होते. या घडामोडींमुळे चीन बिथरला आहे. चीनने युद्धाभ्यासाच्या अंतर्गत नौदलाच्या नौका आणि सैन्य विमानांद्वारे तैवानला घेरले होते.

Advertisement

तैवानवर पूर्णपणे कब्जा करू

चिनी विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी तैवान बेटाच्या चहुबाजूला पार पडलेल्या सैन्याभ्यासाला ‘गंभीर इशारा’ ठरविले आहे. तैवानवर चीन जोपर्यंत पूर्णपणे कब्जा करत नाही, तोवर तैवानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या लोकांचे डोकं फोडण्यात येईल. यादरम्यान चहुबाजूला केवळ रक्त वाहणर असल्याचे वेनबिन यांनी म्हटले आहे. चीन तैवानला स्वतंत्र देशाची मान्यता देण्याच्या विरोधात आहे. दुसरीकडे तैवानच्या लोकांची चीनने यावरील स्वत:चा अधिकार दर्शविणरे बंद करावे अशी इच्छा आहे.

Advertisement
Tags :

.