महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

श्रीपादभाऊंना लोकसभेची उमेदवारी डावलल्यास आपण प्रथम दावेदार

12:02 PM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दयानंद सोपटेंनंतर माजी मंत्री दिलीप पऊळेकर यांचा दावा

Advertisement

म्हापसा : श्रीपादभाऊ हे भाजप पक्षासाठी आधारस्तंभ आहेत. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी श्रीपादभाऊंना नाकारली तर आपण पक्षाचा एकनिष्ठ वरिष्ठ कार्यकर्ता असल्याने उत्तर गोव्यातून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी पक्षाने आपली निवड करावी, असे मत माजी पर्यटनमंत्री दिलीप पऊळेकर यांनी दै. तऊण भारतशी बोलताना मांडले आहे. गेल्या 25 वर्षांपूर्वी श्रीपादभाऊमध्ये जो विकासाचा जोम होता तो आज दिसत नाही. हे जरी सत्य असले तरी श्रीपादभाऊ जाणते झाले. त्यांनी आता निवृत्ती घ्यावी, असे दयानंद सोपटे यांनी भाऊंबद्दल काढलेले शब्द गैर आहेत. श्रीपादभाऊ हे भाजप पक्षासाठी आधारस्तंभ आहेत. इतकी वर्षे त्यांनी एकनिष्ठ राहून पक्षासाठी कार्य केले आहे, असेही ते म्हणाले. माजी आमदार दयानंद सोपटे, आपण व श्रीपादभाऊ हे तिघेही भंडारी समाजाचे असून आम्ही तिघेही उमेदवारीवर दावा करीत आहोत, ही गोष्ट खरी असली तरी सोपटे यांच्या म्हणण्यानुसार भाऊ आता जाणते झाले आहेत, त्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे, असे म्हणणे योग्य नाही. आपण कधीही या पक्षातून त्या पक्षात बेडूकउडी मारली नाही आणि परत भाजपात आलेलो नाही, असा टोला परुळेकर यांनी नाव न घेता दयानंद सोपटे यांना मारला. आपण या पक्षात वरिष्ठ आहे. पक्षाचे काम 1999 मध्ये गोरख मांद्रेकर, सद्गुरू हरमलकर यांच्यानंतर आपण केले. पक्षासाठी तळागाळात कार्य केले आहे. एवढेच कारण माझ्यासाठी उमेदवारीच्या दावेदारीसाठी पुरेसे आहे. तुळशीचे लग्न झाल्यामुळे नवीन नवऱ्यांनी बाशिंग बांधायला सुऊवात केली आहे,  असे श्रीपादभाऊ म्हणतात ते बरोबरच आहे, पण उमेदवारी एकट्यालाच मिळणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article