महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

संशयास्पद आढळल्यास शंख फुंका !

07:00 AM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पश्चिम बंगालमधील बशीरहाट लोकसभा मतदारसंघात 1 जूनला मतदान होणार आहे. तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेख आणि त्याच्या गुंडांच्या अत्याचारांमुळे गेले 10 महिने गाजत असलेला संदेशखाली हा प्रदेश याच मतदारसंघात येतो. भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी संदेशखालीतील महिलांना एक महत्वाची सूचना केली आहे. 1 जूनच्या मतदानापूर्वी किंवा मतदान होत असताना काहीही संशयास्पद हालचाल अवती भोवती आढळली तर महिलांनी शंख फुंकून सर्वांना सावध करावे, अशी ही सूचना आहे. या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने रेखा पात्रा यांना उमेदवारी दिली आहे. पात्रा या स्वत: अत्याचारपिडीत असून त्यांनीच शेख याच्या अत्याचारांविरोधात आंदोलन करण्यात पुढाकार घेतला होता. पात्रा यांच्या प्रचारार्थ आयोजित जनसभेत भाषण करताना अधिकारी यांनी ही सूचना गुरुवारी केली. संदेशखाली किंवा आसपासच्या भागात कोणीही अनोळखी व्यक्ती अगर जमाव आल्यास, किंवा पोलीसांसह कोणी अनोळखी व्यक्ती आपल्या भागात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्यास, किंवा कोठे हिंसाचार करण्याची तयारी कोणी करत असल्यास, अनोळखी शस्त्रधारी व्यक्ती दिसल्यास त्वरित शंखनाद करुन सर्वांना याची सूचना द्यावी. स्वत:ची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हा उपाय महत्वाचा आहे, असेही प्रतिपादन सुवेंदू अधिकारी यांनी त्यांच्या भाषणात केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article