महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मी फूल झाले तर.....

06:49 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शाळेत हमखास हा निबंध असायचाच. खरंतर आपल्या सगळ्यांनाच आपण जे होऊ शकलो नाही ते व्हायचे असते. अशावेळी या कल्पना फार उपयोगी पडतात. रविंद्रनाथ टागोर यांनी आपल्या stray birds..या पुस्तकात याबद्दल खूप छान लिहीलेय The birds wishes if we are clouds and clouds wishes if we are birds..... निळ्या आकाशात उडणारे पक्षी किंवा ढग दोघांनाही एकमेकांची ओढ, पण निळा रंग मात्र समुद्रातून येत असतो. फेसाळलेल्या वाफांच्या पांढऱ्या पुंजक्यांचे ढग रात्री चांदण्यात फिरायला निघतात. अन् लक्षात येतं चांदण्यांना फूल बनून पृथ्वीवर राहायला आवडतं. पण फूलाला मात्र वेगळंच काहीतरी व्हायचं असतं. हा सगळा प्रवास काका कालेलकरांच्या  ‘पुष्प आराधना’ या  लेखात दिसतो अन् कोणाला नेमकं काय बनायचं आहे ते  लक्षात येतं. चांदण्यांची फुलं होतांना काहीजणी दगड होऊन जमिनीत जातात पण अनेक वर्षांनी जमीन खणतांना या अश्मांना शोधून काढतात, त्यांना तासून देखणं रूप मिळतं. अंधाराच्या गुहेतल्या या हिरकण्या विविध रंगात, मौल्यवान बनून तयार होतात. श्रीमंत देखण्या ललनांचे अलंकार बनून, गळ्यात, हातात, कानावर नाकावर ऐटीत विराजमान होतात. गळ्यातल्या रत्नांना अंतरीचे भाव जाणवतात अन् त्यांचे स्वरांकीत सुमधूर गीतं बनतात. या स्वरांना परमेश्वराचे आशिर्वाद लाभले की सगुण रूपाचे वरदान मिळते अन् बाळ रूपात हेच स्वर किलबील करत घराचे गोकुळ करतात......

Advertisement

असे हे अंगरखे बदलणारे ढग आकाशाच्या फिरत्या रंगपटावर चेहरे बदलून वावरत असतात. आम्हा लहान मुलांना या सगळ्यांचंच कुतूहल वाटायचं. रात्री गच्चीत तारे, ग्रह, नक्षत्र कधी मोजताच यायचे नाही. आमच्या सारखेच तेही जागा सोडून पळायचे. धुमकेतू तर हॅरी पॉटरसारखा झाडू घेऊनच हिंडायचा. पण ध्रुव, सप्तर्षी, मात्र आपापल्या जागेवर अढळ असायचे. तेव्हा मात्र मी माझ्या सारखंच व्हायचं ठरवून टाकलं. कारण काहीही व्हायचं म्हंटले तरी सोप्पं नसतं, त्याला खूप कष्ट असतात, हे लक्षात आलं. ‘दुरुन डोंगर साजरे’ यालाच म्हणत असावे.

Advertisement

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article