महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोकणीतून इतिहास लिहिल्यास सरकारचे सहाकार्य

12:01 PM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गोमांतक पुस्तकाचे प्रकाशन

Advertisement

पणजी : गोव्याचा इतिहास कोकणीतून लिहिल्यास राजभाषा संचालनालय, पुरातत्व खाते यांचे निश्चितच सहकार्य मिळेल, असे आश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे. प्रगतीपथ एज्युकेशन फाऊंडेशन, पुणे तर्फे पाटो पणजी येथे संस्कृती भवन मधील सभागृहात झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गोमांतक या पुस्तकाचा कोकणी अनुवाद प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून या नात्याने बोलताना दिले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सावरकरांची प्रतिमा मंत्रालयात लावली म्हणून टीका झाली. परंतु राष्ट्रवादाकडे जुळवूनच घ्यायचे नाही त्यांना काय सांगणार? मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अंदमानला गेलो त्या काळ्या कोठडीला भेट दिली. तेथील तो ’लाईव्ह शो’ बघून सावरकर काय होते, त्यांनी किती भोगलं हे कळलं आणि मला भरून आलं. प्रत्येकाने तिथे एकदा तरी भेट द्यायला हवी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या गोमंतक या महाकाव्याचा डॉ. भूषण भावे यांनी कोकणी अनुवाद करून गोमांतक हे गद्य रूपकात्मक पुस्तक लिहिले आहे त्याचे प्रकाशन यावेळी, मुख्यमंत्री डॉ सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.   व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर, प्रगतीपथ फाऊंडेशनचे विश्वस्त अन्वीत सुधीर फाटक, डॉ. केदार वाळि?बे व डॉ. भूषण भावे उपस्थित होते. सावईकर म्हणाले, सावरकरांच्या विचारात, लेखणीत ताकद होती. खरे सावरकर अनुभवायचे असतील तर अंदमानला भेट देऊन ते ज्या कोठडीत होते तिथे भेट द्यायला हवी. सावरकर समजून घेण्यासाठी भूषण भावे यांचे हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article