कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Solapur News : बहिणीचा तो सल्ला ऐकला असता तर.... ; 24 वर्षीय तरुणाचा तुटला हात

04:41 PM Dec 07, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                       सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू; प्रकृती स्थिर

Advertisement

सोलापूर : सोलापूर रेल्वे स्थानकावर शुक्रवारी रात्री घडलेल्या धक्कादायक दुर्घटनेने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. रात्री १०.५५ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून सुटणाऱ्या कलबुर्गी (सीएसएमटी) मुंबई विशेष गाडीमध्ये धावत धावत चढण्याचा प्रयत्न करताना बाबा अभिमान वाघमारे (वय २४, रा. गांधी नगर, अक्कलकोट रोड) याचा तोल जाऊन तो गाडी आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या जागेत कोसळला. अत्यंत भीषण स्वरूपाच्या या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून डावा हात कोपरापासून अक्षरशः तुटला आहे.

Advertisement

बाबा वाघमारे हा चैत्यभूमी येथे ६ डिसेंबरनिमित्त अभिवादनासाठी जाण्यास निघाला होता. त्याची बहीण त्याला "जाऊ नको!" अशी विनंती करत होती, मात्र त्याने तिचे ऐकले नाहीआणि शेवटी ही दुर्दैवी घटना घडली. अपघात होताच प्लॅटफॉर्मवर एकच आरडाओरडा झाला. प्रवाशांनी ही घटना पाहताच लोहमार्ग पोलीस, आरपीएफ आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना तत्काळ कळवले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन गाडी अर्धा तास प्लॅटफॉर्मवरच थांबविण्यात आली.

दरम्यान, पोलिसांनी मोठ्या प्रयत्नाने जखमी युवकाला बाहेर काढले. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटल येथे हलविले. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रपरिवार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले व मोठी गर्दी झाली. सध्या बाबा वाघमारे याच्यावर ए-ब्लॉक विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

Advertisement
Next Article