For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तुरमुरी राम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात

06:05 AM Jan 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
तुरमुरी राम मंदिरात  मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात
Advertisement

वार्ताहर / उचगाव

Advertisement

तुरमुरी येथील श्रीराम मंदिर, वास्तुशांती, मूर्ति प्रतिष्ठापना व कळसारोहण आणि माउली अश्वरिंगण सोहळ्यातील पहिला दिवस (शनिवार दि. 20)  डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. राम, लक्ष्मण, सीता, हनुमान मूर्ती व कळस मिरवणूक ‘श्रीराम जय राम जय जय राम’ च्या जयघोषात निघाली.

सकाळी 11 वाजल्यापासून तुरमुरी गावाच्या प्रवेशद्वारातून राम, लक्ष्मण, सीता, हनुमान मूर्ती व कळस मिरवणुकीला शानदार प्रारंभ झाला. गावातील सर्व गल्ल्यांमधून ही मिरवणूक सवाद्य निघाली. गावाच्या प्रवेशद्वारावरच तसेच  प्रत्येक गल्लीच्या प्रारंभीच युवक मंडळ आणि ग्रामस्थांनी कमानी उभ्या केल्या होत्या. सुवासिनींनी आपल्या अंगणात व रस्त्यावर रंगीत रांगोळ्या, फुलांचे सडे टाकून अंगण, रस्ता सजविला होता. जागोजागी आंबोत्या, केळीचे मोने, भगव्या पताका, रामाची प्रतिमा असलेले झेंडे, गल्लीतून झळकत होते. भगव्या साड्या परिधान करून कलश घेऊन महिला या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या.घरोघरी या मिरवणुकीला सुवासिनींकडून आरती, पाणी ओतून स्वागत करण्यात येत होते. याबरोबरच पुऊष मंडळींही भगव्या टोप्या, भगवे वस्त्र, भगव्या मफलरी परीधान करून आणि हातामध्ये भगवे झेंडे घेऊन अनवाणी चालत सहभागी झाले होते. वारकरी सांप्रदाय भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे चित्र दिसून येत होते. त्याचबरोबर ट्रॅक्टरमधून लहान मुले मुली रामलल्लाची गाणी म्हणत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.

Advertisement

त्याचबरोबर झांज पथक, ढोल, ताशा अशा धर्तीवर हा मूर्ती व कळस मिरवणुकीचा सोहळा एक आगळावेगळा, गावासाठी लक्षात राहील असा नागरिकांसाठी, भाविकांसाठी वेगळेच आकर्षण ठरत होता.

मिरवणुकीमध्ये ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी व गावातील नागरिक सर्व आपले व्यवहार बंद ठेवून मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे चित्र दिसून येत होते.

Advertisement
Tags :

.