कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उचगावातील धनगर बांधवांना ओळखपत्र वितरण

11:58 AM May 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /उचगाव

Advertisement

येथील प्राथमिक पशुवैद्यकीय खात्यातर्फे व सरकारमार्फत उचगाव गावातील धनगर बांधवांना ओळखपत्र वितरण समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे होते. यावेळी प्रास्ताविक व कार्यक्रमाची माहिती उचगाव व्हेटर्नरी हॉस्पिटलचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ऐलगार यांनी दिली व उपस्थित पाहुण्यांचे त्यांनी स्वागत केले. या ओळखपत्राचा त्यांना संकटसमयी तसेच अडचणीच्या काळात उपयोग होणार आहे. कुठेही मेंढरे घेऊन फिरत असताना कुठल्याही प्रकारचा अपघात किंवा काही झाल्यास या ओळखपत्रामुळे त्यांची ओळख पटणार असून व त्यांना योग्य भरपाई मिळणार आहे. त्याचप्रमाणे धनगर समाजाच्या मुलांना शिक्षणासाठी या ओळखपत्रामुळे लवकर प्रवेश मिळणार आहे. तसेच ज्या काही धनगरांच्या सरकारी योजना असतील त्यांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.समारंभप्रसंगी उचगावातील 15 धनगर बांधवांना ही ओळखपत्र ग्रामपंचायत उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, ग्रा. पं. सदस्य एल. डी. चौगुले व इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी परशराम राजगोळकर, विठ्ठल राजगोळकर, रायाप्पा कुरबुर, राजू कुरबुर, लक्ष्मण कुरबुर, भरमा शहापूरकर, लक्ष्मण शहापूरकर, गंगाराम शहापूरकर, परमेश शहापूरकर, बिराप्पा कुरबुर, फकीराप्पा शहापूरकर, विठ्ठल शहापूरकर, मलावती दर्यानावर, महेश कुरबुर यांना ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला धनगर समाजाचे नागरिक, शरद जाधव, डॉक्टर वर्ग, कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article