For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओळख: एका भावविश्वात रंगला कलाकार मेळावा

01:10 PM Jun 12, 2025 IST | Radhika Patil
ओळख  एका भावविश्वात रंगला कलाकार मेळावा
Advertisement

सांगली / सचिन ठाणेकर :

Advertisement

ओळख... "तुमची तुमच्याशी... तुमच्यातल्या कलाकाराशी.. आणि त्या कलाकाराची मनोरंजन क्षेत्राशी..." हे ब्रीद घेऊन ओळ्ख या संस्थेने जयसिंगपूरमध्ये एक आगळावेगळा कलाकार मेळावा नुकताच आयोजित केला. नाटक, सिनेमा, संगीत, लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीची रंगत असलेल्या या एकदिवसीय स्नेहसंमेलनात सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील शंभरहून अधिक कलाकार एकत्र आले.

सकाळी नऊपासून सायंकाळी सातपर्यंत रंगलेल्या या मैफिलीत पहिल्या सत्रात कलाकारांनी एकमेकांनी ओळख करून दिली. अनुभव शेअर केले. नवोदित कलाकारांनी आपल्या उर्मी व्यक्त केल्या, तर ज्येष्ठांनी त्या उमेदीत दिशा भरली. यशाच्या वाटेने चालणाऱ्यांनी आपले अनुभव सांगताना रस्त्यातील खाचखळगे आव्हाने आणि मार्ग न सोडण्यासाठी काय कष्ट करावे लागतात, केले आहेत त्याची माहिती समोर ठेवली.

Advertisement

दुसऱ्या सत्रात तर अनुभवाचा पूर आला, राष्ट्रपती पुरस्कार विजेते दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे, 'तेंडल्या' ने दिग्दर्शक सनिन जाधव, कोल्हापूरचे जे. के. क्रिएशनचे सिनेमोटोग्राफर किरण जेजुरकर, सांगलीचे ज्येष्ठ नाटककार राजेंद्र पोळ, फिल्म सोसायटी आणि नाट्य चळवळ यामध्ये कार्यरत कुलदीप देवकुळे आणि शिवराज काटकर यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

नाटक, चित्रपट, मालिका, ओटीटी प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया आणि त्यातील प्रतिसाद, यश, अपयश, प्रायोगिक की व्यावसायिक असे अनेक विषय चर्चेला आले स्ट्रगल कोणाला चुकला आहे? यशस्वी होणारा आणि यशस्वी झालेला सगळे एकाच वर्तुळात असतात. फक्त प्रत्येक टप्प्यावरच्या व्यक्तीला आपण तिसऱ्या वर्तुळात तर यशस्वी मंडळी यशाच्या खूप नजीकच्या वर्तुळात वावरतात असा समज आहे. प्रत्यक्षात यश कशामुळे मिळेल हे कोणालाही सांगता येत नाही आणि हात कोण देईल तेही समजू शकत नाही.

या निमित्ताने गाजणाऱ्या सिरीज, नाटक, नित्रपट आणि मालिका यावरही चर्चा झाली. काय पहावे, कसे पहावे, काय शिकावे आणि काय अंगीकारावे यावर विविध पैलूंनी नर्ना झाली. यश मिळो की अपयश सातत्य पाहिजे ते कुठेतरी याच्याकडे घेऊन जाते, हे क्षेत्र निर्दयी आहे असाही सुरू इथे उमटला तर या क्षेत्रात हातात हात घालून चालतील आणि इतरांनाही साथ देतील ते पुढे जातात. माध्यमातील वेगळेपण समजून स्वतःबद्दल करणे गरजेचे, जेथे व्यावसायिकता हवी तेथे व्यावसायिकता आणि जेथे मनाला समाधान हवे येथे कलात्मकता यांना प्राधान्य देण्याचा ताळमेळ साधा, आपल्याला मोठे केलेल्यांना विसरू नका आणि कोणीतरी कान भरले म्हणून फुटून वेगळे होऊ नका, वैयक्तिक आणि सांधिक यश प्रत्येकाला पुढे जाण्यास ठरते असा चर्चेतील सूर उमटला.

युवा अभिनेता पार्थ घाटगे यांनी सांगितलेला मालिका आणि सोशलमीडिया मधील प्रतिसादाचा अनुभव, काही सहाय्यक दिग्दर्शकांपासून प्रोडक्शन मॅनेजरपर्यंत प्रत्येकाने स्वतः काय करू शकतो आणि आपली अपेक्षा काय यावर भाष्य केले. कलाकारांचा सन्मान करणारे व मानधन सुद्धा बुडवणारे यांच्यावरही कलाकारांनी चर्ना केली. जयसिंगपूरातील 'स्वरगुंजन' कराओके संस्थेने कलाकारही सहभागी होते. नव्या ओळखी, संवाद, हास्य, अनुभव आणि प्रेरणा यांनी भरलेला हा मेळावा आगळावेगळं सांस्कृतिक उदाहरण ठरला. याचे आयोजन 'ओळख'चे निशांत-संगीता घाटगे, स्वप्नील प्रकाश, नितीन पाटील (संचालक छोटू महाराज थिएटर), सुशांत पाटील, सुमित आणि अनुराधा साळुंखे, चित्रकार योगेश जाधव, प्रणव मोहिते, हर्षवर्धन कांबळे आणि अभिनेता पार्थ घाटगे यांनी परिश्रमपूर्वक केले.

Advertisement
Tags :

.