आयडीबीआयतर्फे आरोग्य केंद्राला ‘सीबीसी’ मशीन भेट
बेळगाव : कॉलेज रोड येथील आयडीबीआय बँक शाखेतर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून विनायकनगर, शहर प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत सीबीसी (कंप्लीट ब्लड काऊंट) मशीन देण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिकेचे प्रमुख लेखापाल मंजुनाथ बिळगीकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आरोग्य व बँकिंग क्षेत्रातील सहकार्याचे महत्त्व त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले. याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश दंडगी, आयडीबीआय बँक कॉलेज रोड शाखेचे प्रमुख चार्ल्स राजा, आयडीबीआय बँक व्यवस्थापक रोहित हिरेमणी, वैद्यकीय अधिकारी (युपीएचएस)चे पवनदीप, महापालिकेचे लेखा सल्लागार नईम मुजावर उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य पेंद्रातील निदान सेवा अधिक सक्षम होतील आणि स्थानिक नागरिकांना आधुनिक वैद्यकीय तपासणीची सुविधा उपलब्ध होणार आहे.