पापक्षालनासाठी बर्फाळ पाण्यात स्नान
जपानमधील अनोखी परंपरा
हाडं गोठवून टाकणाऱया थंडीत जर तुम्ही कुणाला हिमाच्छादनाखाली वाहणाऱया बर्फाळ पाण्यात स्नान करण्यास सांगितले तर काय कराल? हे ऐकूनच अंग कापू लागेल. परंतु जपानमध्ये नव्या वर्षाचा जल्लोष काही अशाचप्रकारे साजरा केला जातो. जपानी नववर्षाच्या प्रारंभी हजारो लोक बर्फाळ पाण्यात स्नान करतात. लहान मुलांपासून वृद्ध देखील या परंपरेचे पालन करतात. या परंपरेचे पालन केल्याने पापक्षालन होत शरीर शुद्ध होत असल्याचे त्यांचे मानणे आहे.
टोकियोच्या कांडा मायोजिन मंदिरात ही परंपरा पार पडली आहे. येथे ईश्वराकडे प्रार्थना करण्यासाठी शेकडो लोक जमले होते. पुजाऱयाने स्नानाची सूचना केल्यावर लोकांनी लाकडी भांडय़ात ठेवलेल्या बर्फाळ पाण्यात उतरण्यास सुरुवात केली. सुमारे 6 मिनिटांपर्यंत स्नान केल्यावर लोकांनी पूजा केली आणि मग मनसोक्त नृत्य केले आहे.
या परंपरेचे पालन केल्याने नवे वर्ष सुरू झाल्याचे आणि चांगल्या काळास प्रारंभ झाल्याचे वाटते. देवतेचा आशीर्वाद असल्याने बर्फाळ पाण्यात अजिबात थंडी वाटत नसल्याचे तेथील लोकांनी म्हटले आहे. रशियान दरवर्षी एपिफनीच्या दिवशी लोक नदी आणि सरोवरात स्नान करून ईश्वराचे स्मरण करतात. इपिफकनीवेळी लोक पारंपरिक स्वरुपात परिसरातील नदी किंवा तलावात जात बर्फाने गोठलेल्या पाण्यात स्नानासाठी उतरतात. इपिफनीच्या मध्यरात्री सर्व पाणी पवित्र होत असल्याने माणसांना यात स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळत असल्याची रशियात मान्यता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रपती ब्लादिमीरु पुतीन यांनी बर्फाळ पाण्यात स्नान केले आहे. रशियात ही परंपरा 16 व्या शतकापासून चालत आली आहे.