Kolhapur News : इचलकरंजीत कौटुंबिक वादातून चाकू हल्ला; एक गंभीर जखमी
इचलकरंजीत पुन्हा चाकूहल्ल्याची घटना;
इचलकरंजी : जुन्या कौटुंबिक वादातून एक रेकॉर्डवरील गुन्हेगाराने केलेल्या चाकू हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. प्रसाद कामी असे जखमीचे नाव असून, याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार संशयित आदित्य सोनुले याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार जखमीच्या आई गंगा दीपक कामी यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, जखमी प्रसाद यांच्या चुलत बहिणीशी आदित्य सोनुले याचा विवाह झाला आहे. मात्र या दांपत्यामध्ये वाद नेहमीच होत असल्याने प्रसाद यांनी मध्यस्थी करतपत्नीवर हात उचलू नकोस, अशी चेतावणी आदित्यला दिली होती. त्याच वैमनस्यातून गुरुवारी रात्री नदीवेस परिसरात दोघांमध्ये पुन्हा वाद पेटला.
वाद वाढताच संतापलेल्या आदित्य सोनुले याने प्रसाद यांना मारहाण केली आणि जीवे मारण्याचा इशारा देत त्याच्यावर चाकूने हल्ला केला. बचाव करताना प्रसादच्या अंगठ्याला खोल जखम झाली असून तोंड, गळा आणि कानाच्या मागील भागावरही वार झाले आहेत. जखमी प्रसादवर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी तपास केला आहे.