दुचाकीची घासून मारल्याच्या रागातून इचलकरंजीत खून; आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार
इचलकरंजी प्रतिनिधी
शहरातील शहापूर रोडवरील इंदिरानगरामधील मशिदीनजीक राहंणारा परशुराम उर्फ प्रशांत भैऊ कुराडे या तऊणाच्या खून प्रकरणी पोलिसांनी रेकॉर्डवरील दोघा गुन्हेगारांना सोमवारी दुपारी अटक केली. संभ्या उर्फ आदम महंमद मुजावर (रा. नेहऊनगर झोपडपट्टी, इचलकरंजी), नवनाथ उर्फ अजय बापू काशिद (रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक, नमाजगे मळा, इचलकरंजी) अशी त्याची नावे आहेत. तर त्याचा साथिदार साहिल चव्हाण (संपूर्ण नाव पत्ता माहित नाही) हा पसार असून, त्याचा पोलिसांनी शोध सुऊ केला आहे. ही कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी दिली.
तसेच हा खून गुन्हेगार संभ्या उर्फ आदम मुजावर, गुन्हेगार नवनाथ उर्फ अजय काशिद आणि साहिल चव्हाण या तिघांनी दुचाकी घासून मारल्याच्या क्षुल्लक कारणावऊन केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच गुन्हेगार संभ्या उर्फ आदम मुजावर आणि गुन्हेगार नवनाथ उर्फ अजय काशिद हे दोघे काही महिन्यापूर्वी उदय मधूकर गवळी (रा. रेणूकानगर झोपडपट्टी, इचलकरंजी) यांच्या खूनाच्या गुह्यातून कारागृहातून जामिनावर बाहेर आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस निरीक्षक कळमकर म्हणाले, शहरातील शांतीनगर परिसरातील एका समाजाच्या स्मशानभूमीत शनिवारी रात्री अज्ञाताकडून परशुराम उर्फ प्रशांत कुराडे यांच्या डोकीत व पाठीवर सिमेंट कॉक्रिटच्या तुटलेल्या स्लॅबच्या तुकड्याने मारहाण कऊन, खून करण्यात आला होता. खूनानंतर मारेकऱ्यांनी कुराडेंच्या मृतदेहावर मोठमोठे दगड, सिमेंट कॉक्रिटच्या तुटलेल्या स्लॅबच्या तुकडे ठेवले होते. खूनाचा हा प्रकार रविवारी सकाळी काही लोकांच्या निदर्शनास आला. त्यांनी यांची माहिती पोलिसांनी दिली. त्यावऊन गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रयत्नाची पराकष्टा कऊन, कुराडेंच्या नातेवाईकांना बोलावून घेवून ओळख पटवित, खूनाचा गुन्हा नोंद केला. त्यानंतर हा खून कोणी आणि का केला. या दिशेने गावभाग आणि कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तपास सुऊ केला. याच दरम्यान पोलिसांना हा खून शहरातील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार संभ्या उर्फ आदम मुजावर, गुन्हेगार नवनाथ उर्फ अजय काशिद, साहिल चव्हाण या तिघांनी केल्याची माहिती मिळाली. त्यावऊन त्याचा शोध सुऊ केला. याच दरम्यान पोलिसांना गुन्हेगार संभ्या उर्फ आदम मुजावर, गुन्हेगार नवनाथ उर्फ अजय काशिद हे जयसिंगपूर येथे आश्रयाला थांबल्याची माहिती मिळावी. त्यावऊन पोलिसांनी जयसिंगपूर मध्ये धाव घेवून, सोमवारी दुपारी दोघांना पकडून अटक केली.
‘त्या’ दोघा गुन्हेगाराविरोधी गंभीर गुन्हे
परशुराम उर्फ प्रशांत कुराडेंच्या खून प्रकरणी अटक केलेले गुन्हेगार संभ्या उर्फ आदम मुजावर, गुन्हेगार नवनाथ उर्फ अजय काशिद हे दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरोधी शहरातील शिवाजीनगर खून, चोरी तर गावभाग पोलीस ठाण्यात अपहरण, जबरी चोरी, चोरी अशा स्वऊपाचे गंभीर गुन्हे नोंद आहेत. या दाखल गुह्यापैकी काही गुन्हे सध्या न्यायप्रविष्ठ आहे. हे दोघे 11 एप्रिल 2022 रोजी झालेल्या उदय गवळीच्या खूनाच्या गुह्यातून कारागृहातून जामिनावर बाहेर आले आहेत.